Weight Loss Tips : रात्री झोपेतही कमी होऊ शकतं वजन! फक्त 'हे' छोटे बदल करा, सहज बर्न होतील कॅलरीज..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to loose weight while sleeping : केवळ व्यायाम केल्यानेच कॅलरीज बर्न होतात असं नाही, तुम्ही तुमच्या आहारात आणि दिनचर्येत थोडा बदल करून देखील कॅलरीज बर्न करू शकता. आपलं शरीर रात्री झोपेत असतं तेव्हा कॅलरीज साठवतं, हे अनेकांना माहिती आहे. परंतु रात्री झोपेत शरीर कॅलरीज बर्न देखील करू शकतं हे तुम्हाला माहितीये का? चला पाहूया याबद्दल सविस्तर माहिती.
advertisement
1/9

होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. झोपेत शरीर कॅलरीज बर्न करते. परंतु बर्न होणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण हे तुमची पचनक्रिया कशी आहे आणि तुम्ही चांगली झोप घेता का? यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते. झोपताना आपण किती कॅलरीज बर्न करू शकतो आणि कसे ते जाणून घेऊया.
advertisement
2/9
प्रौढ लोकांमध्ये साधाराण आठ तासांच्या झोपेदरम्यान 400 कॅलरीज बर्न होतात, परंतु ज्यांचे स्नायू जास्त असतात किंवा चयापचय जास्त असते ते 500 कॅलरीज बर्न करू शकतात. यावरून तुम्हाला झोपेत असताना तुमचं शरीर ऊर्जा कशाप्रकारे वापरतं याची कल्पना येऊ शकते.
advertisement
3/9
रात्री 8 नंतरचं जेवण तुमचं चयापचय जेवढं मंद करतं, त्यापेक्षा जास्त तुमच्या खाण्याच्या वाईट सवयी करतात. त्यामुळे रात्री किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही काय खाता, याचा तुमच्या पचनक्रियेवर मोठा परिणाम होतो.
advertisement
4/9
दररोज व्यायाम करणे, स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी व्यायाम करणे देखील फायदेशीर ठरू शकते.
advertisement
5/9
वजन कमी केल्याने चयापचय देखील सुधारते. परंतु झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पेये प्याल्याने झोप लवकर येत नाही. यामुळे कॅलरी बर्न होण्याचं प्रमाण देखील कमी होतं.
advertisement
6/9
तुमच्या झोपेची वेळ देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही रात्री झोपण्याची वेळ निश्चित करा. झोपण्यापूर्वी तुम्ही शतपावली देखील करू शकता, जेणेकरून तुम्हाला झोप अधिक सहज येईल.
advertisement
7/9
रात्री झोपण्यापूर्वी स्क्रीनपासून दूर राहा. तुमचा फोन, कॉम्प्युटर किंवा टीव्ही बंद करा. या उपकरणांमधून येणारा प्रकाश तुमच्या झोप खराब करू शकतो. झोपण्याच्या वेळेच्या 1 ते 2 तास आधी सर्व क्रीन बंद करा.
advertisement
8/9
झोपताना ज्या कॅलरीज बर्न होतात, त्या चरबी किंवा कार्बोहायड्रेट्ससह ऊर्जा स्रोत म्हणून वापरल्या जातात. परंतु तुमची एकूण ऊर्जा, स्नायूंची प्रमाण, झोपेची गुणवत्ता आणि रोजची शारीरिक हालचाल अधिक महत्त्वाचे आहेत.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Weight Loss Tips : रात्री झोपेतही कमी होऊ शकतं वजन! फक्त 'हे' छोटे बदल करा, सहज बर्न होतील कॅलरीज..