TRENDING:

Tea recipe: चहा पातळ होतो, बेचव लागतो? 'असा' बनवून पाहा, 2 मिनिटात होईल Perfect!

Last Updated:
अनेकजणांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. सकाळचा चहा म्हणजे काहीजणांसाठी जीव की प्राण असतो, तो जर मिळाला नाही, तर दिवसभर त्यांना काही सुचेनासं होतं. तर काहीजणांना दिवसभरातून कधीही सुचेनासं झालं की ते चहा पितात.
advertisement
1/5
Tea recipe: चहा पातळ होतो, बेचव लागतो? 'असा' बनवून पाहा, 2 मिनिटात होईल Perfect!
चहाचे वेगवेगळे प्रकार असतात, कोरा चहा, दुधाळ चहा, मसाला चहा, गवती चहा, इत्यादी. तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीये का, प्रत्येक घरातल्या चहाची चव वेगवेगळी असते.
advertisement
2/5
इतकंच काय, घरातल्या प्रत्येकाच्या हातच्या चहाची चवही वेगळी असते. त्याचं कारण म्हणजे चहामध्ये मिसळल्या जाणाऱ्या पदार्थांचं प्रमाण.
advertisement
3/5
चहाला अनेकजण ऊर्जास्रोत मानतात. कारण एक कप चहामुळे काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. सगळा आळस दूर होतो. काहीजणांना कमी साखरेचा चहा आवडतो. परंतु जवळपास सर्वांनाच कडक असा वाफाळता चहा हवा असतो. त्यामुळे आज आपण चहाची परफेक्ट रेसिपी पाहणार आहोत.
advertisement
4/5
टपरीवर जसा चहा मिळतो तसा स्वादिष्ट चहा बनवण्यासाठी पाणी कमी, दूध जास्त, साखर, चहापावडर आणि आलं घ्यावं. सर्वात आधी पातेल्यात दूध घ्यायचं, मग चहापावडर आणि साखर घालून शेवटी पाणी ओतून आलं घालावं. या मिश्रणाला उकळी आली की, एक अतिशय स्वादिष्ट असा चहा बनून तयार होईल.
advertisement
5/5
थंडीत अनेकजणांना आल्याचा चहा आवडतो. आरोग्याच्या दृष्टीने तो चांगला असतो. तर, उन्हाळ्यात लोक जास्तीत जास्त वेलचीचा चहा पितात. चहा आल्याचा असो किंवा वेलचीचा असो. हे पदार्थ चहामध्ये शेवटी घालायचे ज्यामुळे त्यांची चव जशीच्या तशी उतरते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tea recipe: चहा पातळ होतो, बेचव लागतो? 'असा' बनवून पाहा, 2 मिनिटात होईल Perfect!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल