Tea Recipes : फक्त आलं-वेलचीच नाही, किचनमधल्या 'या' वस्तूही चहाला देतात वेगळी आणि अप्रतिम चव..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How to make deferent types of tea : चहाप्रेमींना चहाचे कितीही प्रकार प्यायला दिले तरी ते कमीच वाटतं. त्यांना अजून अजून चहा किती चांगला होऊ शकेल हे पाहायचे असते. अशाच काही चहाप्रेमींसाठी आम्ही आलं आणि वेलची पलीकडे चहाची चव वाढवणारे काही पदार्र्ह सांगत आहोत.
advertisement
1/5

तुम्हालाही वेगळा चहा पिण्याची इच्छा असेल रोजच्या चहाची चव नकोशी झाली असेल तर किचनमधील काही खास मसाले आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून ते शाही आणि आरोग्यदायी बनवू शकता.
advertisement
2/5
तुम्ही दालचिनी, केशर, तुळस, बडीशेप आणि जायफळ यांसारखे घटक चहामध्ये टाकू शकता. या वस्तू चहाचा केवळ सुगंध वाढवत नाहीत तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. बदलत्या ऋतूंमध्ये असा मसालेदार आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध चहा तब्येतीलाही सांभाळतो.
advertisement
3/5
चहामध्ये दालचिनी घातल्याने थोडा गोडवा आणि उबदारपणा येतो, जो शरीराला थंडीपासून वाचवण्यास मदत करतो. केशरमुळे चहाला शाही रंग आणि सुगंध येतो. ज्यामुळे त्याची चव वाढते. तज्ञांच्या मते, मानसिक ताण कमी करण्यासाठी केशर देखील उपयुक्त मानले जाते. एक चिमूटभर जायफळदेखील चहा मस्त सुगंध देते.
advertisement
4/5
चहामध्ये तुळशीची पाने घातल्याने त्याला हर्बल चव मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. बदलत्या ऋतूंमध्ये सर्दी आणि फ्लू रोखण्यासाठी तुळशीचा चहा उपयुक्त मानला जातो. काळी मिरी चहाला थोडा तिखटपणा देते, ज्यामुळे शरीर उबदार राहते. बडीशेप चहाला नैसर्गिक गोडवा देते आणि थंडावा देते. आयुर्वेदानुसार, हे मिश्रण पचन सुधारण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी फायदेशीर मानले जाते, ज्यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते आणि मन आनंदी राहते.
advertisement
5/5
काही लोक चहामध्ये कोको पावडर घालून त्या चॉकलेटी चवीचा आनंद घेतात. शिवाय, लॅव्हेंडरसारख्या फुलांचा वापर चहाला एक अनोखा सुगंध देतो. दालचिनी, केशर, बडीशेप आणि गुलाबाच्या पाकळ्यांसोबत एकत्र केल्यावर चहाला एक शाही चव मिळते. हे मिश्रण पारंपारिक मसाला चहापेक्षा वेगळा अनुभव देते. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tea Recipes : फक्त आलं-वेलचीच नाही, किचनमधल्या 'या' वस्तूही चहाला देतात वेगळी आणि अप्रतिम चव..