DIY Natural Lipstick : महागड्या लिपस्टिक वापरता, तरी ओठांना त्रास होतो? सहज बनवा बीटरुटचं नॅच्युरल लिपस्टिक
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to make lipstick from beetroot : लिपस्टिकने आपला मेकअप पूर्ण होतो. काही मुलींना रोज लिपस्टिक लावायची सवय असते. अशावेळी काही केमिकल्स असलेल्या लिपस्टिक तुमच्या ओठांना इजा पोचवू शकतात. हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही घराच्या घरी सहज बीटरूटचं लिपस्टिक बनवू शकता.
advertisement
1/5

बीटरूट जसं आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतं. तसंच ते आपल्या त्वचेसाठीही खूप फायद्याचं असतं. तुम्ही बऱ्याचदा बीटरूटच्या लिपबाम बद्दल ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला बीटरुटचं लिपस्टिक कसं बनवायचं याची माहिती देत आहोत.
advertisement
2/5
बीटरूटची ही लिपस्टिक तुमच्या ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग देते, यातील अँटीऑक्सिडंट्स ओठ हेल्दी ठेवतात. तसेच यामध्ये असणाऱ्या इतरही वस्तू तुमच्या ओठांसाठी फायदेशीर ठरतात. चला पाहूया ही लिपस्टिक कशी बनवायची.
advertisement
3/5
बीटरुटची लिपस्टिक बनवण्यासाठी तुम्हाला 2-3 टेबलस्पून ताज्या बीटरुटचा रस, 1 टेबलस्पून मेण किंवा व्हॅसलीन, 1 ते 2 थेंब व्हिटॅमिन ई तेल आणि 1 टेबलस्पून ग्लिसरीन लागेल.
advertisement
4/5
बीटरूट लिपस्टिक बनवण्यासाठी सर्वात आधी बीटरुटचा रस पॅनमध्ये घेऊन 2-3 मिनिटे उकळवा. हा रस थोडा घट्ट झाल्यावर बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर एका काचेच्या छोट्या डब्यात टाका. त्यामध्ये 1 चमचा मेण आणि 1 चमचा ग्लिसरीन घाला. यानंतर हा डबा व्हॅक्स पेपरने 1 मिनिट झाकून मायक्रोवेव्ह करा.
advertisement
5/5
आता या गरम मिश्रणात व्हिटॅमिन ई तेलाचे 2 थेंब घाला आणि चांगले मिसळा. नंतर हे एका लिपस्टिक कंटेनर किंवा सध्या कंटेनरमध्ये भरा. यानंतर किमान 6 तास किंवा रात्रभर सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. अशाप्रकारे तुमची लिपस्टिक तयार आहे. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
DIY Natural Lipstick : महागड्या लिपस्टिक वापरता, तरी ओठांना त्रास होतो? सहज बनवा बीटरुटचं नॅच्युरल लिपस्टिक