फर्निचर घेताना सावधान! 'या' दिवशी चुकूनही करू नका खरेदी, होईल मोठं नुकसान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आपल्या घराच्या सौंदर्यात फर्निचरचा मोलाचा वाटा असतो. मात्र, वास्तुशास्त्रानुसार फर्निचर खरेदी करताना केवळ डिझाईन किंवा किंमत पाहून चालत नाही, तर ते कोणत्या दिवशी खरेदी केले आहे, हे देखील महत्त्वाचे असते. चुकीच्या दिवशी खरेदी केलेले फर्निचर घरात नकारात्मकता आणि आर्थिक समस्या निर्माण करू शकते.
advertisement
1/7

आपल्या घराच्या सौंदर्यात फर्निचरचा मोलाचा वाटा असतो. मात्र, वास्तुशास्त्रानुसार फर्निचर खरेदी करताना केवळ डिझाईन किंवा किंमत पाहून चालत नाही, तर ते कोणत्या दिवशी खरेदी केले आहे, हे देखील महत्त्वाचे असते. चुकीच्या दिवशी खरेदी केलेले फर्निचर घरात नकारात्मकता आणि आर्थिक समस्या निर्माण करू शकते.
advertisement
2/7
अशुभ दिवस टाळा: वास्तुशास्त्रानुसार, मंगळवार, शनिवार आणि अमावस्या या दिवशी विसरूनही फर्निचर किंवा लाकूड खरेदी करू नये. हे दिवस क्रूर ग्रहांचे किंवा पितरांचे मानले जातात. या दिवशी लाकूड घरात आणल्याने घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात आणि विनाकारण वादाचे प्रसंग उद्भवतात.
advertisement
3/7
अमावस्या आणि शुक्रवारची युती: जर अमावस्येच्या दिवशी शुक्रवार येत असेल, तर अशा दिवशी फर्निचर खरेदी करणे अत्यंत अशुभ मानले जाते. शुक्र हा चैनीचा कारक असला तरी अमावस्येच्या प्रभावामुळे या दिवशी घेतलेले फर्निचर घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते.
advertisement
4/7
योग्य लाकडाची निवड: फर्निचर कोणत्या लाकडापासून बनवले आहे, हे पाहणे महत्त्वाचे असते. वास्तुशास्त्रानुसार सागवान, शिसम, कडुनिंब, अशोक किंवा साल यांसारख्या सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या झाडांचे लाकूड शुभ मानले जाते. मात्र, पिंपळ, वडाचे झाड किंवा चंदनाचे लाकूड फर्निचरसाठी वापरणे टाळावे, कारण ही झाडे पूजनीय मानली जातात.
advertisement
5/7
फर्निचरचा आकार आणि कोपरे: घरात नेहमी चौकोनी किंवा आयताकृती आकाराचे फर्निचर असावे. गोलाकार, अंडाकृती किंवा त्रिकोणी आकाराचे फर्निचर मानसिक तणावास कारणीभूत ठरू शकते. तसेच, फर्निचरचे कोपरे जास्त तीक्ष्ण नसावेत; ते गोलाकार किंवा गुळगुळीत असल्यास घरात सकारात्मक लहरी टिकून राहतात.
advertisement
6/7
रंगांचे शास्त्र: फर्निचरसाठी नेहमी हलके आणि डोळ्यांना सुखावणारे रंग निवडावेत. गडद काळा किंवा गडद निळा रंग फर्निचरसाठी वापरणे टाळावे, कारण हे रंग राहू आणि शनीचा प्रभाव वाढवतात, ज्यामुळे घरात उदासवाणे वातावरण निर्माण होऊ शकते. क्रीम, हलका तपकिरी किंवा नैसर्गिक लाकडी रंग सर्वोत्तम मानले जातात.
advertisement
7/7
फर्निचरची दिशा: जड फर्निचर नेहमी घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे. यामुळे घरामध्ये स्थिरता येते. याउलट हलके फर्निचर उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवल्याने घराची प्रगती होते आणि शांतता लाभते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
फर्निचर घेताना सावधान! 'या' दिवशी चुकूनही करू नका खरेदी, होईल मोठं नुकसान