Bigg Boss Marathi 6 : रुचितासोबत नेमकं काय सुरू होतं? विशालने कॅमेरासमोर अखेर सगळं खरं सांगूनच टाकलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Vishal - Ruchita Relation Truth : Bigg Boss Marathi 6 च्या घरात विशाल आणि रुचिता यांच्यात नेमकं काय सुरू होतं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अखेर विशालने कॅमेरासमोर येत सगळं सांगितलं.
advertisement
1/8

Bigg Boss Marathi च्या घरात प्रत्येक सिझनमध्ये स्पर्धकांमधील मैत्री, भांडणं आणि नात्यांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं जातं. सहाव्या सिझनमध्ये विशाल आणि रुचिता यांच्यातील नातं देखील बरंच चर्चेत राहिलं. दोघांनीही एकमेकांविषयी असलेल्या भावना त्यांनी अनेकदा व्यक्त केल्या होत्या. मात्र घराबाहेर आणि सोशल मीडियावर त्यांच्या नात्यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा आणि ट्रोलिंगही सुरू आहे.
advertisement
2/8
घरात असताना विशालने स्पष्टपणे सांगितलं होतं की त्याला रुचिता आवडते. "मला ती आवडते. आमच्यात वयाचं अंतर आहे पण त्याचा मला काही फरक पडत नाही" असं तो म्हणाला होता.
advertisement
3/8
दुसरीकडे रुचितानेही विशालबद्दल बोलताना "मला विशालचा प्रेझेन्स खूप आवडतो", असं सांगितलं होतं. याविषयावरून दोघांमध्ये भांडणंही झालं होतं. त्यामुळे दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे याबद्दल सगळ्यांनाच प्रश्न पडला होता.
advertisement
4/8
विशाल आणि तिच्यातील नात्यामुळे काही दिवस रुचिता देखील अस्वस्थ असल्याचं दिसून आलं होतं. बाहेर लोक काय विचार करत असतील याचं प्रेशर तिला आलं होतं. दोघांच्या वयातील अंतरावरून अनेकांनी टीका केली. काहींनी दोघांनी गेमसाठी लव्ह अँगल तयार केला असल्याचा आरोपही केला.
advertisement
5/8
आठव्या आठव्यात रुचिता घराबाहेर गेली. भाऊचा धक्का एपिसोडनंतर विशाल खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. कॅमेरासमोर बोलताना त्याचा पूर्णपणे ब्रेकडाऊन झाला.
advertisement
6/8
तो म्हणाला, "लोक आपल्याबद्दल खूप घाणेरडं बोलले, अनेक गोष्टी सांगितल्या. पण आपल्या दोघांना कधीच फरक पडला नाही. कारण आपल्याला माहिती होतं की आपल्यात नेमकं काय आहे."
advertisement
7/8
विशाल पुढे म्हणाला, "आपल्यात एक प्युअर कनेक्शन आहे. हार्ट टू हार्ट ट्रस्टचं कनेक्शन आहे. मी कधीच तुला युझ केलं नाही. नेहमी स्वतःच्या पुढे तुला ठेवलं. उमेदवारी असो किंवा काही असो मी तुलाच दिलं. मी कधीच तुझ्याबरोबर गेम खेळलो नाही."
advertisement
8/8
रुचिता घराबाहेर गेल्यानंतर विशाल खूप इमोशनल झाला. तो म्हणाला, "खूप वीक फिल करतोय. आय एम सॉरी. मी नेक्स्ट वीक बाहेर आलो ना तर खूप बरं वाटेल".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : रुचितासोबत नेमकं काय सुरू होतं? विशालने कॅमेरासमोर अखेर सगळं खरं सांगूनच टाकलं