TRENDING:

Team India : 'माझा हक्ष पहिल्यांदाच...' वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बाप भावुक, अक्षर पटेलची इमोशनल पोस्ट!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप लागोपाठ दुसऱ्यांदा जिंकून टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. भारताने दिलेल्या 256 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा फक्त 159 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे भारताने हा सामना 96 रननी जिंकला.
advertisement
1/6
'माझा हक्ष पहिल्यांदाच...'  वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बाप भावुक, अक्षर पटेलची पोस्ट
संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि जसप्रीत बुमराह भारताच्या या विजयाचे हिरो ठरले. संजू, अभिषेक आणि इशान यांनी झंझावाती अर्धशतकं झळकावली त्यामुळे टीम इंडियाने मोठा स्कोअर केला, यानंतर बुमराहने 4 ओव्हरमध्ये 15 रन देऊन 4 विकेट घेतल्या.
advertisement
2/6
वेस्ट इंडिजविरुद्धचा करो या मरो सामना, इंग्लंडविरुद्धची सेमी फायनल आणि न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये लागोपाठ 3 अर्धशतकं केलेल्या संजू सॅमसनला प्लेअर ऑफ द वर्ल्ड कप देऊन गौरवण्यात आलं, तर बुमराहला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
advertisement
3/6
टी-20 वर्ल्ड कपची फायनल जिंकल्यानंतर अक्षर पटेलने इमोशनल पोस्ट लिहिली आहे. हा सामना पाहण्यासाठी अक्षर पटेलची पत्नी आणि त्याचा लहान मुलगाही स्टेडियममध्ये होते. मॅच जिंकल्यानंतर अक्षर त्याच्या मुलाला कडेवर घेऊन स्टेडियममध्ये फिरत होता.
advertisement
4/6
'संस्मरणीय स्पर्धा होती, प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक आव्हानासाठी आणि वाटेत मिळालेल्या प्रत्येक पाठिंब्यासाठी आभारी आहे, पुन्हा एकदा चॅम्पियन्स', अशी पोस्ट अक्षर पटेलने केली आहे.
advertisement
5/6
याआधी 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्येही अक्षर पटेलने मोलाची कामगिरी केली होती. अक्षरने टीम अडचणीत असताना 31 बॉलमध्ये 47 रनची खेळी केली आणि विराटला साथ दिली, त्यामुळे भारताचा विजय शक्य झाला.
advertisement
6/6
दरम्यान यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीमचा उपकर्णधार असलेल्या अक्षर पटेलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आलं, ज्यात टीम इंडियाचा पराभव झाला. अक्षर पटेलला टीमबाहेर ठेवून चूक झाल्याचं नंतर भारतीय टीम मॅनेजमेंटने मान्य केलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : 'माझा हक्ष पहिल्यांदाच...' वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बाप भावुक, अक्षर पटेलची इमोशनल पोस्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल