TRENDING:

blood pressure measure रक्तदाब मोजताना या चुका करू नका; अन्यथा होईल नुकसान

Last Updated:
आजच्या धकाधकीच्या जीवनात हायपरटेन्शन, ब्लडप्रेशर किंवा साध्या मराठीत रक्तदाब हा आजार अनेकांना होतोय. अगदी लहान मुलांपासून ते तरूणाई रक्तदाबाला बळी पडल्याचं दिसतय. तुम्हाला माहितीये का योग्य पद्धतीने मात्र रक्तदाब (ब्लडप्रेशर) कसं मोजतात ते ? रक्तदाब मोजताना अनेक जण ज्या चुका करतात त्या तुम्ही तर नाही करत ना ? जाणून घेऊया रक्तदाब मोजण्याची योग्य पद्धत.
advertisement
1/9
blood pressure measure रक्तदाब मोजताना या चुका करू नका
रक्तदाबाचे उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) आणि कमी रक्तदाब (लो ब्लडप्रेशर )असे दोन प्रकार आहेत.
advertisement
2/9
रक्तदाब मोजण्यासाठी स्पीग्मोमॅमोमीटर वापरला जातो. आज डिजीटल स्वरूपात देखील स्पीगमोमॅमोमीटर उपलब्ध आहे ज्याला साध्या भाषेत बीपी अप्रेटस असं म्हटलं जातं.
advertisement
3/9
बीपी अप्रेटस कोणतंही असो मात्र रक्तदाब तपासताना तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने रक्तदाब मोजला तर निकाल चुकू शकतात.
advertisement
4/9
डॉक्टरांकडे गेल्या गेल्या लगेच रक्तदाब तपासू नका. आधी 5-10 मिनिटे शातं बसा. तुमचा श्वासोच्छवास सामान्य होऊ द्या मगच रक्तदाब तपासा.
advertisement
5/9
रक्तदाब तपासण्यापूर्वी 30 मिनिटे आधी चहा, कॉफी, तंबाखूचे सेवन करू नका. यामुळे रक्तदाबावर परिणाम होतो.
advertisement
6/9
रक्तदाब मोजताना बीपी अप्रेटस हे तुमच्या हृदयाच्या समान पातळीत आणा. जास्त वर किंवा खाली ठेवल्यास रक्तदाब चुकीचा येऊ शकतो.
advertisement
7/9
रक्तदाब मोजताना तुम्ही ज्या हाताला कफ लावता तो हात टेबलावर ठेवा.
advertisement
8/9
रक्तदाब मोजताना कफ चांगल्या प्रकारे बांधा. जर तो ढिला राहिला तर रिडिंग चुकू शकतात.
advertisement
9/9
डिजीटल मीटरने रक्तदाब मोजताना जर तुम्हाला योग्य रिडिंग हवे असतील तर 5 मिनीटांच्या अंतराने 3 वेळा रक्तदाब मोजून सरासरी काढण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
blood pressure measure रक्तदाब मोजताना या चुका करू नका; अन्यथा होईल नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल