TRENDING:

Home Remedy : कोळ्यांची जाळी वाढतयंत? 'या' 5 प्रभावी ट्रिक्सने राहतील घरापासून दूर! सोये उपाय नक्की ट्राय करा

Last Updated:
How to remove increasing spider from home : तुमच्या घराच्या छतावर, कोपऱ्यांवर किंवा भिंतींवर वारंवार कोळ्याचे जाळे दिसत असेल, त्यामुळे प्ले घर अजिबात चांगले दिसत नाही. वारंवार कोळ्याचे जाळे येणे अयोग्य मानले जाते. ते घरात नकारात्मक ऊर्जा देखील आणतात, म्हणून कोळ्याचे जाळे वारंवार स्वच्छ करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला यावर काही प्रभावी आणि सोपे उपाय सांगत आहोत. यांनी तुमच्या घरात कोळी येणं बंद होईल.
advertisement
1/7
कोळ्यांची जाळी वाढतयंत? या 5 ट्रिक्सने राहतील घरापासून दूर! सोपे उपाय ट्राय करा
घरातील कोळी घालवताना, साफसफाई करताना काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. कारण जर कोळी तुमच्या शरीरावर चिकटली तर ती मोठ्या समस्या निर्माण करू शकते. अशा परिस्थितीत, काही घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही कोळ्याच्या जाळ्यापासून कायमचे मुक्त होऊ शकता, ज्यामुळे तुमच्या भिंती आणि कोपरे स्वच्छ दिसतील.
advertisement
2/7
कोळीची येण्याची ठिकाणं बंद करा : कोळी येण्याचे प्रवेशद्वार बंद करा. कोळी बहुतेकदा दारं, खिडक्या किंवा जिथे हवा खेळती असते अशा बिंदूंभोवती असलेल्या लहान भेगांमधून आत प्रवेश करतात. यामध्ये ड्रेनेज आउटलेट देखील आहे. तुमच्या घरात भिंतीवर एकही भेग असेल तर ती आधी सील करा. या भेगा झाकण्यासाठी तुम्ही बारीक जाळीचा वापरही करू शकता.
advertisement
3/7
घरात विशिष्ठ रोपं लावा : तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा घरामध्ये कोळी दूर ठवणरी रोप लावा. ​तुळशी, पुदिना, लॅव्हेंडर आणि रोझमेरी या वनस्पतींना तीव्र वास कोळ्यांना आवडता नाही. आणि त्या अशा ठिकाणी येणे बंद करतात.
advertisement
4/7
लाईटची योग्य निवड : जास्त गजबज किंवा कचरा असलेले ठिकाण कोळीला आवडते. तुमच्या बाल्कनीत गार्डन स्वच्छ ठेवा. रोपं आणि वेली बाहेरील भिंतींना स्पर्श करणार नाही याची काळजी घ्या. पानांचा कचरा आणि न वापरलेले बागेतील साहित्य हे कोळ्यांसाठी सर्वोत्तम लपण्याचे ठिकाण आहे. बाल्कनीमध्ये पिवळे किंवा उबदार एलईडी लाईट वापरा. यामुळे कोळी तिथे जास्तकाळ राहणार नाही.
advertisement
5/7
नैसर्गिक होममेड स्प्रे : घरातील कोळी घालवण्यासाठी तुम्ही नैसर्गिक रिपेलेंट्स आणि स्प्रे वापरू शकता. कोळीला तीव्र सुगंध आवडत नाही. घरी तयार केलेले तीव्र सुगंध असलेले मिश्रण वापरा. तुम्ही व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण बनवून ते खिडक्या, प्रवेशद्वार आणि दरवाज्यांवर मिश्रण स्प्रे करू शकता. तसेच तुम्ही पेपरमिंट आणि निलगिरी तेलांचा स्प्रे बनवू शकता. याचाही नेहमी कोळी येतात त्या ठिकाणी वापर करा. हळूहळू कोळ्यांचे येणे बंद होईल.
advertisement
6/7
महत्त्वाचं म्हणजे घर स्वच्छ ठेवा : घरातील सामान पसारलेलं आणि घरात खूप धुळ असेल तर अशा ठिकाणी कोळी वाढतात. त्यामुळे नियमित साफसफाई करा. यामुळे कोळीला आपल्या घरात घर करायची संधीच मिळणार नाही. जाळे दिसताच काढून टाका. बाथरूम आणि स्वयंपाकघरात हवा खेळती राहील याची काळजी घ्या.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Home Remedy : कोळ्यांची जाळी वाढतयंत? 'या' 5 प्रभावी ट्रिक्सने राहतील घरापासून दूर! सोये उपाय नक्की ट्राय करा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल