ग्रहणाचं सावट टळलं, पण नेगेटिव्हिटी कशी करावी दूर? सूर्यग्रहणानंतर 'अशी' करा घराची शुद्धी!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. ग्रहण काळात सूर्यापासून निघणारी प्रखर आणि दूषित किरणे पर्यावरणावर परिणाम करतात, ज्याचा अंश आपल्या घरातही उरतो.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. ग्रहण काळात सूर्यापासून निघणारी प्रखर आणि दूषित किरणे पर्यावरणावर परिणाम करतात, ज्याचा अंश आपल्या घरातही उरतो.
advertisement
2/7
म्हणूनच, ग्रहण संपल्यानंतर केवळ स्वतःचे स्नान करणे पुरेसे नसून, घराची शुद्धी करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणानंतर घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी खालील शास्त्रीय उपाय नक्की करा.
advertisement
3/7
मिठाच्या पाण्याने घराची स्वच्छता: ग्रहण संपल्यानंतर घराची पहिली स्वच्छता मिठाच्या पाण्याने करावी. पाण्यात थोडे खडे मीठ टाकून संपूर्ण घराचा पोछा मारावा. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.
advertisement
4/7
गंगाजलाचा शिडकावा: घर पुसून झाल्यानंतर एका पात्रात गंगाजल घ्यावे. त्यामध्ये तुळशीची पाने किंवा दुर्वा बुडवून संपूर्ण घरात, कोण्याकोपऱ्यात आणि मुख्य दरवाजावर या पाण्याचा शिडकावा करावा. यामुळे ग्रहण काळातील अशुद्धता दूर होऊन घरात पवित्रता येते.
advertisement
5/7
देवघर आणि मूर्तींची शुद्धी: ग्रहणाचा सुतक काळ संपल्यानंतर देवघरातील मूर्तींना स्नान घालणे आवश्यक असते. मूर्तींना गंगाजल किंवा पंचामृताने स्नान घालून त्यांचे शुद्धीकरण करावे. त्यानंतरच देवांना नवीन वस्त्रे अर्पण करून त्यांची नियमित पूजा सुरू करावी.
advertisement
6/7
धूपाचा किंवा कापूरचा वापर: घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी ग्रहणानंतर गुग्गुल, लोबान किंवा भीमसेनी कापूर जाळावा. याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा. कापराच्या धुरामुळे वातावरणातील सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात आणि घरातील हवा शुद्ध होते.
advertisement
7/7
दान आणि मंत्रोच्चार: शुद्धीकरणानंतर गायत्री मंत्र किंवा 'ॐ सूर्याय नमः' या मंत्राचा जप करावा. तसेच, ग्रहणानंतर गरिबांना पांढरे धान्य, तांबे किंवा जुने कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे ग्रहणाचे दोष कमी होतात आणि कुटुंबात समृद्धी येते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
ग्रहणाचं सावट टळलं, पण नेगेटिव्हिटी कशी करावी दूर? सूर्यग्रहणानंतर 'अशी' करा घराची शुद्धी!