TRENDING:

Kicthen Tips : ऑफ सिजनमध्येही खाता येईल मेथी! 'या' सोप्या पद्धतींनी करा स्टोअर, दीर्घकाळ होणार नाही खराब

Last Updated:
How to store methi for long time : मेथीची भाजी हिवाळ्यात मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे हिवाळयात लोक ती आवर्जून खातात. याचे आपल्या शरीराला अनेक फायदेही होतात. मात्र मेथीची भाजी एकदा आणली की, ती 1 ते 2 दिवसांत वापरावी लागते, नाहीतर ती खराब होते. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मेथीची भाजी अनेक दिवस स्टोअर करू शकता.
advertisement
1/7
ऑफ सिजनमध्येही खाता येईल मेथी! या पद्धतींनी करा स्टोअर, दीर्घकाळ होणार नाही खराब
मेथीची भाजी फ्रिजमध्ये तशी 3-4 दिवस ताजी राहते. नंतर मात्र तिची पानं पिवळी पडू लागतात आणि ती कडू होऊ लागते. मग ही भाजी फेकून द्यावी लागते. पण ही भाजी दीर्घकाळ टिकवण्याचे आणखीही काही उपाय आहेत. याने मेथीचे स्वरूप बदलेले पण तिची चव आणि सुगंध मात्र तसेच राहील चला पाहूया मेथी कशी साठवायची.
advertisement
2/7
आधी मेथी स्वच्छ निसून घ्या. नंतर ती स्वच धुवा. साठवण्यापूर्वी मेथी व्यवस्थित कोरडी करून घ्या. ती सुटी कापडावर टाकून हलक्या हाताने डबा. म्हणजे तिचे पाणी कमी होईल आणि ती लवकर कोरडी होईल.
advertisement
3/7
मेथी साठवण्याची पहिली पद्धत म्हणजे ती एअर फ्रायरमध्ये डिहायड्रेट करणे किंवा वाळवणे. एअर फ्रायरमध्ये मेथीची पानं टाकून 110°C वर 15 मिनिटे वाळवा, अधूनमधून हलवा. पानं पूर्णपणे कुरकुरीत आणि कोरडी झाली म्हणजे साठवणायसाठी तयार आहेत.
advertisement
4/7
एअर फ्रायरशिवायही तुम्ही मेथी वळवू शकता. मेथीची पण स्वच्छ कापडावर किंवा ताटामध्ये घरातच सावलीत पसरवा आणि 4-5 दिवसांपर्यंत वाळवा. यानेही ती दराचे होईल. नंतर एअर टाईट कंटेनरमध्ये साठवा.
advertisement
5/7
मेथीची भाजी साठवण्यासाठी नेहमी एअर टाईट कंटेनर वापरा. हे कंटेनर पूर्णपणे कोरडे असावे. यामध्ये मेथीचा सुगंध आणि चव बराच काळ टिकून राहते.
advertisement
6/7
हे मेथीचे कंटेनर तुम्ही फ्रिजमध्येही ठेवू शकता. फ्रिजमध्ये मेथी अनेक महिने चांगली राहाते. ही मेथी तुम्ही कोणत्याही भक्तीची चव वाढवण्यासाठी भाजून टाकू शकता. या मेथीचं बेसन घालून पिठलंही बनवता येऊ शकतं.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kicthen Tips : ऑफ सिजनमध्येही खाता येईल मेथी! 'या' सोप्या पद्धतींनी करा स्टोअर, दीर्घकाळ होणार नाही खराब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल