TRENDING:

Cat care tips: थंडीत तुमच्या लाडक्या मनीमाऊला ठेवायचंय हेल्दी? मग डॉक्टरांनी सांगितलेले 5 उपाय नक्की ट्राय करा

Last Updated:
हिवाळ्यात तापमानात घट झाल्याने माणसांप्रमाणेच घरातील पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील महत्वाचे असते. एखादवेळी माणसं त्यांना काही दुखलंखुपलं तर सांगू शकतात परंतु मुके प्राणी त्यांना होणारा त्रास व्यक्त करू शकत नाहीत. अशावेळी थंडीच्या मोसमात त्यांची अधिक काळजी घेणे महत्वाचे ठरते. अधिकतर घरातील पाळीव मांजरींमध्ये हवामान बदलाचा जास्त प्रभाव होतो अशावेळी त्यांची कशी काळजी घ्यावी याबाबत डॉ. अवधेश कुमार वर्मा यांनी सांगितले आहे.
advertisement
1/5
थंडीत तुमच्या मनीमाऊला ठेवायचंय हेल्दी? डॉक्टरांनी सांगितलेले 5 उपाय ट्राय करा
डॉक्टर नेहमी सांगतात की जर तुम्हाला घरी मांजर पाळण्याची आवड असेल तर त्यांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. घरातील लहान पाळीव मांजरांचे लसीकरण करणे आवश्यक असून यामुळे त्यांचे अनेक जीवघेण्या आजारांपासून संरक्षण होऊ शकते. तेव्हा मांजरांचे लसीकरण करण्यासाठी त्यांना प्राण्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन जावे.
advertisement
2/5
थंडीच्या दिवसात एखाद्या लहानमुलांप्रमाणे मांजरीच्या पिल्लाची काळजी घेतली पाहिजे. जर तुमच्या घरी मांजरीची पिल्ले असतील आणि ती दिवसा सारखी झोपी जात असतील तर अशावेळी मांजरीच्या पिल्लांना त्रास देऊ नका. त्यांना योग्य तेवढी झोप घेऊ द्या जेणेकरून त्यांचे आरोग्य बिघडू नये.
advertisement
3/5
हिवाळ्यात निच्चांकी तापमान हे पाळीव प्राण्यांसाठी घातक ठरू शकते. तेव्हा प्रयत्न करा की जर तुमच्याकडे मांजरीचे लहान पिल्लू असेल तर त्यांना जास्त घराबाहेर काढू नका. कारण निच्चांकी तापमान त्यांच्यासाठी घातक ठरू शकत आणि त्यांना अनेक आजारांची लागण होऊ शकते.
advertisement
4/5
तुमच्या घरी जर मांजरीचे लहान पिल्लू असेल तर त्यांना अधिक पोषणाची आवश्यकता असते. जेव्हा मांजरीची पिल्लं 5 ते 6 महिन्यांची होतील तेव्हा त्यांना दिवसातून 4 ते 6 वेळा खायला घालावे. जर तुमच्याकडे कुत्रा आणि मांजर दोन्ही असतील तर मांजरींना चुकूनही कुत्र्याचे अन्न खायला देऊ नका. जेव्हा मांजर 8 ते 10 महिन्यांची होईल तेव्हा तिला तुम्ही घरात बनवलेलं भात, दूध, दही सारखं अन्न खायला देऊ शकता.
advertisement
5/5
हिवाळाच नाही तर इतरही ऋतूंमध्ये मांजरींना दररोज अंघोळ घालू नका. जेव्हा मांजरीच्या शरीरातून दुर्गंध येण्यास सुरुवात होईल शक्यतो अशावेळी त्यांना साधारण पाण्याने अंघोळ घाला. तसेच डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मांजरीच्या केसांवरून रोज ब्रश फिरवला पाहिजे जेणेकरून त्यांचे तुटलेले केस निघून जातील आणि घरभर पसरणार नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cat care tips: थंडीत तुमच्या लाडक्या मनीमाऊला ठेवायचंय हेल्दी? मग डॉक्टरांनी सांगितलेले 5 उपाय नक्की ट्राय करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल