Mini Italy Travel : तुम्हाला मिनी इटलीबद्दल माहितीये? पुण्याहून अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहे 'हे' सुंदर ठिकाण!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Mini Italy : आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत.अनेक ठिकाणं खूप सुंदर आहेत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या त्या परिसराच्या संस्कृतीचं वैशिष्ठ्य पाहायला मिळतं. मात्र तुम्हाला माहितीये का, आपल्याच महाराष्ट्रात एक ठिकाण आहे, जे इटलीची प्रेरणा घेऊन बनवलं गेलं आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रातील ही मिनी इटली नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असते. इथे तुम्हाला रंगीबेरंगी रस्ते पाहायला मिळतात, तलावाकाठची सुंदर दृश्य अनुभवता येतात. इथली शांतता आणि सौंदर्य तुम्हाला अद्भुत आनंद देऊ शकतात. हे ठिकाण महाराष्ट्रात कुठे आहे आणि त्याला भारताची 'मिनी इटली' का म्हंटलं जातं, याबद्दल महिती इथे आहे.
advertisement
2/7
महाराष्ट्रातील लवासा हे शहर इटलीची प्रेरणा घेऊन बनवलं गेलेलं शहर आहे. हे ठिकाण खरं तर इटालियन रिव्हिएरावरील सुंदर पोर्टोफिनो शहराची प्रतिकृती म्हणून तयार करण्यात आले आहे. इथे तलावाकाठच्या रंगीबेरंगी स्टाइलच्या बिल्डिंग, तलावाकाठचे दगडी रस्ते या ठिकाणाला एक अद्भुत युरोपियन वातावरण देतात.
advertisement
3/7
सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेले आणि वरसगाव तलावाच्या काठावर वसलेले लवासा हे नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिक नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे. भारतात इटालियन अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला इटालीप्रमाणेच बांधकाम आणि सर्व गोष्टी पाहायला मिळतात. तुम्ही मुंबई पूण्याहून इथे एका दिवसाची पिकनिक करायलाही जाऊ शकता.
advertisement
4/7
इथल्या वराश्का तलाव आणि त्याच्याजवळील रंगीबेरंगी इमारतीमुळे हे ठिकाण आणखी मनमोहक बनते. निवांत चालण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी किंवा फक्त काठावर बसून नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
advertisement
5/7
तुम्हाला अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करायला आवडत असतील तर तुमच्यासाठी इथे करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. इथे तुम्हाला तलावात जेट स्कीइंग आणि कयाकिंगसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला ट्रेकिंग आणि माउंटन बाइकिंगमध्ये रस असेल तर तुम्ही इथे डोंगरांमध्ये ट्रेकिंगला जाऊ शकता.
advertisement
6/7
लवासा हे हिरवीगार वनराई आणि नैसर्गिक पर्वतांनी नटलेले ठिकाण आहे. इथे तुम्ही आराम करू शकता, फिरू शकता. लवासाला जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे.
advertisement
7/7
तुम्ही मुंबईचे असाल किंवा कोणत्याही इतर शहरातून येत असाल तर लवासाला जाण्यासाठी तुम्हाला आधी पुण्यात यावं लागेल. पुण्याहून तुम्ही बाय रोड अवघ्या दोन तासांत लवासाला पोहोचू शकता. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mini Italy Travel : तुम्हाला मिनी इटलीबद्दल माहितीये? पुण्याहून अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहे 'हे' सुंदर ठिकाण!