Hemant Dhome : हेमंत ढोमेचा 40 वा बर्थडे, बायको क्षितीची स्पेशल डिमांड! म्हणाली, 'बाकी सगळं होतंय...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Hemant Dhome Birthday : अभिनेता हेमंत ढोमेच्या वाढदिवशी बायको क्षिती जोगनं शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे. क्षितीनं पोस्टमध्ये काय लिहिलंय?
advertisement
1/8

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.
advertisement
2/8
या खास दिवशी त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री क्षिती जोग हिनेही एक खास पोस्ट शेअर करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
3/8
क्षिती जोगनं सोशल मीडियावर नवऱ्याला प्रेमळ शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टमध्ये तिने हेमंतसाठी काही खास इच्छा व्यक्त केल्या आहेत.
advertisement
4/8
क्षितीने पोस्टमध्ये लिहिलंय, "भरारी घेत रहा.. स्वप्न बघत रहा.. प्रामाणिकपणे काम करत रहा.. आणि आमचे भरपूर लाड करत रहा... बाकी होतयं सगळं.. 40 व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा पाटील!!! Happiest birthday to you partner"
advertisement
5/8
"आमचे भरपूर लाड करत रहा", अशी डिमांड क्षितीनं हेमंतकडे केली आहे. त्यांच्या नात्यातील केमिस्ट्री आणि प्रेम यावेळी दिसून येत आलं. सोशल मीडियावरही या कपलवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
advertisement
6/8
हेमंत ढोमे आणि क्षिती जोग ही मराठी इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय जोडी मानली जाते. दोघेही आपल्या कामामुळे आणि नात्यामुळे कायम चर्चेत असतात.
advertisement
7/8
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकताच दोघांचा 'क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात हेमंत ढोमेने दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती, तर क्षिती जोगने निर्मितीबरोबरच अभिनयही केला होता. विशेष म्हणजे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही हिट ठरला.
advertisement
8/8
ज्यांनी हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला नाही त्यांच्यासाठी तो आता झी 5 मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. प्रेक्षकांकडून या सिनेमालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Hemant Dhome : हेमंत ढोमेचा 40 वा बर्थडे, बायको क्षितीची स्पेशल डिमांड! म्हणाली, 'बाकी सगळं होतंय...'