TRENDING:

Baby Name In Marathi : शंकर, चंद्राचा अंशच तो, सोमवारी जन्मलेल्या मुलांसाठी नावे

Last Updated:
Monday born Baby Name In Marathi : सोमवार हा भगवान शिव शंकरचा वार, तसंच हा दिवस चंद्राला समर्पित आहे. तसंच सोमवारी जन्मलेल्या बाळाचे गुण या सगळ्यावरून सोमवारी जन्मलेल्या बाळांसाठी मराठी नावांची यादी.
advertisement
1/7
Baby Name In Marathi : शंकर, चंद्राचा अंशच तो, सोमवारी जन्मलेल्या मुलांसाठी नावे
हिंदू संस्कृतीत बाळाचं नाव ठेवणं म्हणजे फक्त नाव निवडणं नसतं, तर जन्माचा दिवसही लक्षात घेतला जातो. त्याच्या जन्माच्या दिवसाशी संबंधित देवतेचे गुण आणि आशीर्वाद त्यांना अंतर्भूत करणं हासुद्धा उद्देश असतो.
advertisement
2/7
हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार हा एका देवाचा मानला जातो. सोमवार हा शिवशंकराचा. त्यामुळे सोमवारी जन्मलेल्या बाळाला तुम्ही शंकरावरून नाव देऊ शकता.
advertisement
3/7
सोमवारी जन्मलेल्या मुलांसाठी शंकरावरून नावं : शिवांश : शिव अंश, इंद्रनील - नीलम आणि भगवान शिवाचे दुसरे नाव, अकुल - भगवान शिवाचे दुसरे नाव, भार्गव - तेज प्राप्त झालेला आणि शिवाचे प्रतीक, देवांश - देवाचा भाग, इथिराज- सर्वोच्च सत्ता आणि भगवान शिव, शिवेश : यशाच्या देवतांचा स्वामी, शिवेंद्र : राजांचा देवता किंवा स्‍वामी.
advertisement
4/7
तसंच ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी जन्मलेल्या काही मुलांमध्ये चंद्राचे तत्व जास्त असतं. या मुलांवर चंद्राचं राज्य असल्याचं मानलं जातं. त्यामुळे तुम्ही त्यांना चंद्रावरून नावं देऊ शकतात. तसंच त्यांच्या नावावर तुम्ही तारे, पांढरा रंग आणि शीतलता यांच्याशी निगडीत ठेवू शकता.
advertisement
5/7
सोमवारी जन्मलेल्या मुलांसाठी चंद्रावरून नावं : चंद्र : सोमवार हा दिवस चंद्राला समर्पित असतो, सोम : चंद्राला सोम देखील म्हटले जाते, सोमन: चंद्रासारखा, शीतांशु : चंद्र, अयंक : चंद्र, चित्रांक : चंद्र, सोहेल : सुंदर किंवा चमकदार.
advertisement
6/7
तसंच सोमवारी जन्मलेल्या मुलांबाबत बोलायचं तर ही मुलं कुटुंबाप्रती दयाळू , प्रेमळ, स्वभावाने थंड, संवेदनशील असतात. या वैशिष्यांवरूनही तुम्ही वरूनही तुम्ही त्यांचं नामकरण करू शकता.
advertisement
7/7
सोमवारी जन्मलले्या मुलांसाठी वैशिष्ट्यांवरून नावं : नवनीत: नवीन आणि आनंदी, शुभम: शुभ भाग्‍य किंवा सौभाग्‍य, उदय: प्रगती, वृद्धी किंवा सकाळ, मृगांक : पावन किंवा विशेष, नक्‍श : वैशिष्ट्ये, युवान - आकर्षक आणि श्रीमंत, शिवेन : शुद्ध आणि दयाळू
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Baby Name In Marathi : शंकर, चंद्राचा अंशच तो, सोमवारी जन्मलेल्या मुलांसाठी नावे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल