Pillow Hygiene : तुमची फेव्हरेट उशी बदलण्याची वेळ आलीये? डॉक्टरांनी सांगितलं हे घातक संकेत ओळखा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आरोग्य चांगलं हवं असेल तर झोप पुरेशी आणि चांगली होणं अतिशय गरजेचं असतं. झोप पूर्ण झाल्यास शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य चांगले राहते. यामुळे तुमची कार्यक्षमता देखील वाढते. त्यामुळं कामाइतकच लक्ष झोपेवरही देणं तेवढंच करजेचं असतं.
advertisement
1/11

चांगली झोप व्हावी यासाठी फक्त वेळेवर झोपणं पुरेसं नसतं. तुमच्या बेडरूममधील वातावरण, तुमंच्या बेडची स्थिती, अंथरूण-पांघरूण देखील चांगलं असणं गरजेचं असतं. यात सर्वात महत्त्वाची असते ती तुमची उशी. अनेकांना उशीशिवाय झोप येत नाही. उशीचा मानेला योग्य आधार मिळत नसेल तर त्याचा परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर होऊ शकतो.
advertisement
2/11
तुमची उशी सुस्थितीत आणि स्वच्छ असणं गरजेचं असतं. तसंच ती उशी आवश्यक असल्यास बदलणंही गरजेचं असतं. कारण आपण दररोज काही तास आपलं डोकं उशीवर ठेवून झोपतो. त्यामुळं तिची स्वच्छता आणि गुणवत्ता चांगली राखणं महत्त्वाचं आहे. तुम्ही उशी बराच काळ बदलली नाही तर त्याचा परिणाम तुमची त्वचा आणि मानेवर होऊ शकतो, तसंच तुमची झोप देखील वारंवार खराब होऊ शकते.
advertisement
3/11
झोपेशी संबंधित विषयांवर माहिती देणाऱ्या प्रसिद्ध अमेरिकन स्लीप फाउंडेशननुसार, तुमची उशी 1 ते 2 वर्षांनी बदलणं गरजेचं असतं. तुम्ही उशी उशी स्वच्छ, आधार देणारी आणि ॲलर्जी-मुक्त असली पाहिजे. त्यामुळे तज्ञ दर एक ते दोन वर्षांनी उशी बदलण्याचा सल्ला देतात. परंतु हे पूर्णपणे उशीच्या मटेरियल आणि गुणवत्तेवर अवलंबून असतं.
advertisement
4/11
तुम्हाला सकाळी उठल्यावर मान आखडल्यासारखं वाटत असेल किंवा तुमची मान सकाळी उठल्यानंतर दुखत असेल, तसेच तुम्हाला रात्री उशीची आरामदायी स्थिती शोधणं कठीण जात असेल तर ती उशी आता तुम्हाला पुरेसा आधार देऊ शकत नाहीये. त्यामुळे ती बदलणं योग्य ठरेल.
advertisement
5/11
घरातील गाद्या जशा काही काळानंतर दबतात तशाच उशा देखील सपाट होतात किंवा त्यात गाठी तयार होतात. त्यामुळं त्या बदलणं गरजेचं बनतं. तुमच्या उशीवर जास्त पिवळे डाग पडले असतील, किंवा रात्रीच्या वेळी तुम्हाला त्वचेवर ॲलर्जी जाणवत असेल तर ही देखील नवीन उशी घेण्याची वेळ आल्याचे चिन्हं आहेत.
advertisement
6/11
उशी ही विविध प्रकारच्या मटेरियलपासून बनवली जाते. त्यामुळं त्यांचं आयुष्य देखील वेगवेगळं असतं. पॉलिएस्टरच्या उशा साधारणपणे एक वर्ष टिकतात, तर लेटेक्ससारख्या मजबूत मटेरियलपासून बनवलेल्या उशा तीन वर्षांपर्यंत टिकू शकतात. फोमच्या उशीबाबत तिची क्वालिटी तिचे आयुष्य ठरवते. चांगल्या क्वालिटीची उशी जास्त काळ टिकू शकते.
advertisement
7/11
उशा आणि उशीचे कव्हर नियमितपणे धुणं देखील गरजेचं असतं. प्रत्येक वेळी चादर किंवा बेडशीट धुताना उशीचं देखील कव्हर धुवा. अनेक प्रकारच्या उशा या मशीनमध्ये सहज धुऊन वाळवता येतात. त्यामुळं त्यातील धूळ, घाम आणि घाण कमी होते आणि त्यांचं आयुष्य वाढतं.
advertisement
8/11
जुन्या उशांवर धूळ किंवा बुरशी वाढू शकते आणि त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी देखील होऊ शकतं. नाक गळणं, डोळ्यांची जळजळ किंवा त्वचेला खाज सुटणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय चेहऱ्यावरील आणि केसांतील तेल, घाम किंवा लाळ देखील उशांवर जमा होऊन डाग निर्माण करू शकतात.
advertisement
9/11
उशी ही डोकं आणि मानेला योग्य आधार देण्यासाठी असते. यामुळे झोपेत तुमचे शरीर सुस्थितीत राहते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. परंतु काही काळ उशी वापरल्यानंतर ती दबली जाते किंवा खराब होते.
advertisement
10/11
अशी दबलेली उशी वापरल्याने पाठीच्या कण्याला योग्य स्थितीत ठेवणं शक्य होत नाही. असं झालं तर सकाळी उठल्यानंतर मान, खांदे आणि स्नायूंमध्ये वेदना जाणवू शकतात. त्यामुळे उशी स्वच्छ ठेवणं आणि ती योग्य स्थितती नसल्यास बदलणं गरजेचं असतं.
advertisement
11/11
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Pillow Hygiene : तुमची फेव्हरेट उशी बदलण्याची वेळ आलीये? डॉक्टरांनी सांगितलं हे घातक संकेत ओळखा