TRENDING:

Bigg Boss Marathi नंतर The 50 जिंकला शिव ठाकरे, ट्रॉफी मिळाली पण 50 लाखांचं कॅश प्राइझ कुणी भलताच घेऊन गेला

Last Updated:
The 50 Winner Shiv Thakare : द 50 या रिएलिटी शोच्या विजेत्यासाठी ट्रॉफी आणि 50 लाखांचं कॅश प्राइझ होतं. शिव ठाकरे विजेता होताच त्याला ट्रॉफी मिळाली पण कॅश प्राइझ नाही, असं का?
advertisement
1/9
The 50 जिंकला शिव ठाकरे, ट्रॉफी मिळाली पण 50 लाखांचं कॅश प्राइझ कुणी भलताच घेऊन गेला
बिग बॉस मराठी 2 चा विजेता मराठमोळा शिव ठाकरेने The 50 या हिंदी रिएलिटी शोमध्ये आपला डंका गाजवला आहे. लायनच्या महालात आपणच शेर आहोत हे शिव ठाकरेने दाखवून दिलं.
advertisement
2/9
1 फेब्रुवारीला सुरू झाला हा शो. 50 दिवस 50 स्पर्शक अशी त्याची कॉन्सेप्ट होती. 50 स्पर्धकांसह शोची सुरुवात झाली. अनेक आठवड्यांच्या स्पर्धा आणि आव्हानांनंतर स्पर्धकांची संख्या हळूहळू कमी होऊन टॉप फाइव्हपर्यंत पोहोचली. 
advertisement
3/9
तब्बल 50 दिवसांनी 22 मार्च रोजी द 50 शोचा फिनाले झाला. ज्यात शिव ठाकरेसह फैसल शेख उर्फ ​​मिस्टर फैसू, रजत दलाल, कृष्णा श्रॉफ आणि काका असे 5 स्पर्धत होते. हे 5 आणि त्याआधीचे 44 अशा एकूण 49 स्पर्धकांवर एकटा शिव भारी पडला. 
advertisement
4/9
'द 50' चा विजेता म्हणून नाव घोषित होताच आणि  हातात ट्रॉफी येताच शिव भावुक झाला. त्याने आपल्याला सर्वात आधी घरी जाऊन आपल्या आईला भेटायचं असल्याची इच्छा व्यक्त केली.  तो म्हणाला की, त्याला स्वतःच्या हाताने ट्रॉफी तिच्या हवाली करायची होती, कारण संपूर्ण शोमध्ये ती त्याच्या विजयासाठी प्रार्थना करत होती.
advertisement
5/9
स्पर्धकांनी विविध टास्कमधून 40 लाख 44 हजार रुपयांचा बक्षिसाचा निधी उभारला, विजेत्यासाठी 50 लाख रुपयांचं कॅश प्राइझ होतं. 
advertisement
6/9
शिवला द 50 चा विजेता म्हणून ट्रॉफी मिळाली पण कॅश प्राइझ नाही. कॅश प्राईझ कुणी दुसराच घेऊन गेला. शोच्या फिनालेमध्ये हा एक अनपेक्षित ट्विस्ट होता.
advertisement
7/9
शिवला मिळालेलं कॅश प्राइझ त्याच्या फॅनला मिळालं आहे. शिवने द 50 शो जिंकल्यानंतर त्याचा फॅन मालामाल झाला आहे.
advertisement
8/9
शोच्या नियमानुसार विजेत्याचं कॅश प्राइझ त्याच्या रजिस्टर चाहत्यांपैकी एका लकी चाहत्याला मिळणार होतं आणि ते शिवच्या सीताराम आघाव नावाच्या फॅनला मिळालं आहे.  शिवचा फॅन सीतारामला हा कॅश प्राइझचा चेक शो दरम्यान देण्यात आला.  शिवने स्वतः हा निर्णय जाहीर केला आणि सीतारामने त्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्याचे आभार मानत चेक त्याला दिला.
advertisement
9/9
शिवने आपला विजय प्रिन्स नरुलालाही समर्पित केला, ज्याने त्याला शेवटच्या फेरीपर्यंतच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. उपांत्य फेरीच्या टास्क दरम्यान अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी स्पर्धकांना संकेत आणि झेंड्यांशी संबंधित एक शारीरिक आव्हान पूर्ण करायचं होतं. प्रिन्सने सर्वात वेगाने टास्क पूर्ण करून तिकीट मिळवलं. पण त्याने आपलं स्थान शिवला देण्याचे ठरवलं, कारण त्याने आधीच अनेक रिॲलिटी शो जिंकले होते आणि तरुण स्पर्धकांना संधी मिळावी अशी त्याची इच्छा होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi नंतर The 50 जिंकला शिव ठाकरे, ट्रॉफी मिळाली पण 50 लाखांचं कॅश प्राइझ कुणी भलताच घेऊन गेला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल