TRENDING:

Astrology: खुशखबर येण्याचा दिवस 26 मार्च! गजकेसरी योग जुळल्याचा 3 राशीच्या लोकांना दुहेरी फायदा

Last Updated:
Astrology: नशीब चमकण्याची कोणाची वेळ केव्हा येईल, हे कोणाला सांगता येईलच असं नाही. पण, ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती आणि जुळून येणारे शुभ योग यावरून राशीभविष्य सांगितलं जातं. अनपेक्षितरित्या काही राजयोग जुळून येतात आणि त्याचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो. आता लवकरच 26 मार्च रोजी विशेष योग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 26 मार्च हा एक विशेष दिवस मानला जातोय.
advertisement
1/6
खुशखबर येण्याचा दिवस 26 मार्च! गजकेसरी योग जुळल्याचा 3 राशीच्या लोकांना दुहेरी फायदा
या दिवशी गुरू ग्रह आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी योग नावाचा राजयोग तयार होत आहे. या राजयोगाविषयी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हा असा काळ असेल की, कठोर परिश्रमाचे जलद आणि उत्तम परिणाम मिळू शकतात.
advertisement
2/6
असा योग जुळून येण्याला बरेच जण संधीचा काळ मानतात, तर काही जण याला उच्चकोटीच्या आत्मविश्वासाचा काळ म्हणतात. विशेष म्हणजे, हा योग काही राशींसाठी करिअर, आर्थिक स्थिती आणि ओळख या बाबतीत नवीन संधी देणारा असू शकतो. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो, परंतु संकेत निश्चितच उत्साहवर्धक आहेत.
advertisement
3/6
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा गुरू आणि चंद्र एका विशिष्ट स्थितीत म्हणजे केंद्रस्थानांमध्ये असतात तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो. हा योग शहाणपण, संतुलन आणि संधी यांचे प्रतीक मानला जातो."गज" म्हणजे हत्ती, जो स्थिरता आणि संयम दर्शवतो आणि 'केसरी' म्हणजे सिंह, तो नेतृत्व आणि धैर्याचे प्रतीक आहे. या दोन ऊर्जा एकत्र येतात, तेव्हा व्यक्तीची निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढू शकतो. प्रत्येक ग्रहयोगाप्रमाणे याचा परिणाम सर्व राशींवर होईल, परंतु हा काळ तीन राशींसाठी अधिक फायदेशीर मानला जातो.
advertisement
4/6
मिथुन: मिथुन राशीसाठी हा काळ नातेसंबंध आणि करिअर या दोन्हीमध्ये बदल घडवून आणू शकतो. बऱ्याच लोकांना अचानक नवीन प्रकल्प किंवा नोकरीच्या संधी मिळू शकतात. आपण बऱ्याच काळापासून पदोन्नतीची वाट पाहत असाल तर आता बॉसच्या लक्षात तुमची मेहनत येऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून काही नफा होण्याचीही शक्यता आहे.
advertisement
5/6
सिंह: हा योग विशेषतः सिंह राशीसाठी फायदेशीर आहे. तुमच्या ओळखी वाढू शकतात आणि त्या ओळखींमुळे भविष्यात आर्थिक फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी सुधारू शकते, वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याचे संकेत आहेत. काहींना अचानक बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्नाची संधी देखील मिळू शकते.
advertisement
6/6
कन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग त्यांचे करिअर अधिक चांगले करण्यास हातभार लावेल. खूप काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ लागतील त्यांन तुमचा आत्मविश्वास वाढेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: खुशखबर येण्याचा दिवस 26 मार्च! गजकेसरी योग जुळल्याचा 3 राशीच्या लोकांना दुहेरी फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल