महाराष्ट्र केसरीच्या फायनल सामन्यात 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने पहिल्या मिनिटालाचा आक्रामक सुरुवात केली होती. तर अनुभवी हर्षवर्धन सदगीर संयमी खेळीने सूरूवात केली होती. यावेळी हर्षवर्धनला बाहेर केल्याने महेंद्रला एक गुण मिळाला होता. त्यानंतर महेंद्र गायकवाडचा दुहेरी पटाचा प्रयत्न हर्षवर्धन सदगीनरने धुडकावून लावला होता. त्यानंतर हर्षवर्धन सदगीरला एक गुण देण्यात आला होता.कारण महेंद्रला ताकीद देऊन ही तसाच खेळ खेळत होता.शेवटी 3 मिनिटाच्या खेळानंतर सामना 1-1 बरोबरीत होता.
advertisement
सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख या दोन्ही दोन्ही मल्लांनी पहिल्या मिनिटापासून आक्रामक सूरूवात केली होती. यावेळी 'बाहुबली' महेंद्र सिकंदर शेखने ताबा मिळवत दोन गुण मिळवले होते. त्यानंतर स्टेपआऊट करून महेंद्र गायकवाडला एक गुण पटकावून 3 गुणांची आघाडी घेतली होती. त्यामुळे पहिल्या फेरीत महेंद्र गायकवाड 3 गुण सिकंदर शेख शुन्य गुणावर होता.
त्यानंतर महेंद्र गायकवाडला अॅक्टीव्हीटी पिरियडचा टाईम देण्यात आला होता. पण अॅक्टीव्हीटी पिरियडमध्ये महेंद्र गायकवाडला गुण घेता आला नाही, त्यामुळे हर्षवर्धनच्या खात्यात एक गुण आला. अशाप्रकारे त्याची दोन गुणांची आघाडी झाली.त्यानंतर पुन्हा एक डाव टाकत हर्षवर्धन सदगीरने दोन गुण पटकावले आणि 4 गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर शेवटच्या क्षणी महेंद्र गायकवाड हा आक्रामक होताना दिसला होता. शेवटी स्टेप आऊटचा महिंद्राने एक गुण मिळवला. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. आणि हर्षवर्धन सदगीरने 4-3 अशा फरकाने सामना जिंकत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.
दरम्यान हे दोन्ही पैलवान अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीत तयार झालेले असून एकाच आखाड्यात सराव करणारे आहेत.त्यापैकी आज हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला आहे.
