TRENDING:

Aajache Rashibhavishya: संकटांचा काळ सरला, सोमवार उगवला! मेष ते मीन राशींसाठी गेमचेंजर दिवस, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: आजचा सोमवार मेष ते मीन राशींसाठी खास असणार आहे. ज्योतिषी अशोक पाटील यांनी आजचं राशीभविष्य सांगितलं आहे
advertisement
1/13
Aajache Rashibhavishya: संकटांचा काळ सरला, सोमवार उगवला! मेष ते मीन राशींसाठी गेमचेंजर दिवस, आजचं राशीभविष्य
मेष राशीसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येत आहे. तुमच्या व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या ठिकाणी संधी निर्माण होतील. या संधीचा फायदा उचला. आर्थिक लाभाची देखील शक्यता आहे. अधिकचा खर्च टाळा.
advertisement
2/13
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम जाणार असून तुम्ही करत असलेल्या मेहनतीची फळे तुम्हाला मिळणार आहेत. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल. एखाद्या शुभ कार्यात जाण्याचा योग आहे. आनंदाची बातमी मिळेल. खर्च जपून करा.
advertisement
3/13
मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा अति घाई संकटात नेई अशा पद्धतीचा असणार आहे. त्यामुळे आज खूप संयमाने प्रत्येक परिस्थिती हाताळावी लागेल. कोणत्याही गोष्टीमध्ये अति घाई करू नका. तुमची अति घाई तुमचे खूप मोठे नुकसान करू शकते. आर्थिक बाबतीत सावध राहा
advertisement
4/13
कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. भावनिक निर्णय घेणे टाळा. कोणत्याही गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया देऊ नका. कामात संयम ठेवा. कुटुंबीयांशी संवाद वाढवा. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
advertisement
5/13
सिंह राशीसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. आज आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून चांगली प्रतिक्रिया मिळू शकते. नवीन प्रोजेक्टची संधी मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. आज आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीचा अति ताण घेऊ नका. योग्य नियोजन केल्यास सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे
advertisement
7/13
तुळ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आजच्या दिवशी कुटुंबामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादविवादही होण्याची शक्यता असून परिस्थिती संयमाने हाताळा. एखादा आर्थिक निर्णय घेताना हजार वेळा विचार करा. तज्ञांचा सल्ला घेऊनच अंतिम निर्णय घ्या. आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
8/13
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सोने पे सुहागा अशा पद्धतीचा असणार आहे. आजच्या दिवसात नवीन संधी निर्माण होणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. आज सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होण्याची शक्यता आहे.
advertisement
9/13
धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. प्रवासाची शक्यता आहे, विशेषतः कामानिमित्त. नवीन अनुभव मिळतील. शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले संकेत आहेत. प्रत्येक गोष्टीत संतुलन राखणे महत्त्वाचे आहे.
advertisement
10/13
मकर राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. कुटुंबीयांचा आधार मिळेल. कामात हळूहळू प्रगती होईल. कोणत्याही गोष्टीचा तणाव न घेता शांतपणे परिस्थितीनुसार काम करा. तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील.
advertisement
11/13
कुंभ राशीसाठी आजचा दिवस भावनिक असणार आहे. नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. कामाचं योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
advertisement
12/13
मीन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस उत्तम योग घेऊन येत आहे. आज नवीन कल्पना सुचतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. व्यवसायात बदल करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळ आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: संकटांचा काळ सरला, सोमवार उगवला! मेष ते मीन राशींसाठी गेमचेंजर दिवस, आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल