TRENDING:

Weather Alert: वादळ, विजा अन् पुन्हा धोक्याचा अलर्ट, महाराष्ट्रावर तिहेरी संकट, आजचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट कायम असून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
advertisement
1/7
Weather Alert: वादळ, विजा अन् पुन्हा धोक्याचा अलर्ट, महाराष्ट्रावर तिहेरी संकट, आजचं हवामान अपडेट
ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्राला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे उष्णतेची लाट असतानाच काही भागात अवकाळी संकट घोंघावत आहे. गेल्या 24 तासांत हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट असतानाच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पुन्हा अस्मानी संकटाचा धोका आहे. 23 मार्च रोजीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/7
मार्चच्या सुरुवातीला असणारं कोकणावरचं संकट पुन्हा फिरून आलंय. काही दिवस अवकाळा पावसाने हैराण केल्यानंतर उष्ण आणि दमट हवामानाचा धोका वाढला आहे. आज मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात तापमान 32-37 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उकाडा आणि आर्द्रतेमुळे अस्वस्थता जाणवेल.
advertisement
3/7
पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांत उष्णतेचा पारा चढला असून अवकाळी अलर्ट कायम आहे. आज सातारा, सांगली आणि सोलापूर परिसरात ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होईल. कमाल तापमान 34-38 अंशांच्या दरम्यान राहील. अवकाळी पावसामुळे शेती, फळबागा आणि रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार भागात उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. हवामान उष्ण आणि कोरडे राहील. काही भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचा कोणाताही अलर्ट नाही. कमाल तापमान 35-39 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यात देखील उन्हाचा पारा आणि पावसाच्या धारा धोकादायक ठरणार आहेत. बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत 30-50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहील. तसेच विजांसह अवकाळी पाऊस होईल. लातूर आणि धाराशिवला 72 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमान 35-38 अंशांच्या दरम्यान राहील.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावतीसह सर्वच जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि कोरडे राहील. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, अवकाळी पावसाचा धोका कमी झाला आहे. आज कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही. मात्र, आता तापमानात वाढ होण्याची शक्यता असून येत्या काही दिवसांत पुन्हा पारा चाळीशी गाठण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 36-39 च्या दरम्यान राहील.
advertisement
7/7
एकंदरीत, राज्यात उष्णतेचा प्रभाव वाढत आहे. यंदा मार्चमध्येच सरासरीपेक्षा जास्त तापमान आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फळबागा आणि पिकांची काळजी घ्यावी लागेल. कोकणात उकाड्याने आरोग्याच्या समस्या किंवा उष्माघाताचा धोका आहे. पुढील 2-3 दिवसांत पारा 3 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: वादळ, विजा अन् पुन्हा धोक्याचा अलर्ट, महाराष्ट्रावर तिहेरी संकट, आजचं हवामान अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल