TRENDING:

Photo: मुंबई-गोवा महामार्गावर भयानक वाहतूक कोंडी, ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Last Updated:
Mumbai Goa Highway Traffic: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. माणगाव आणि इंदापूर इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.
advertisement
1/5
Photo: मुंबई-गोवा महामार्गावर भयानक वाहतूक कोंडी, ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
advertisement
2/5
सुट्टीचा आनंद घेऊन मुंबईकडे परतणाऱ्या पर्यटकांना या कोंडीचा मोठा फटका बसला. विशेषतः माणगाव शहर ते मुगवली फाटा दरम्यान तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
advertisement
3/5
शनिवार-रविवारच्या सुट्टीनिमित्त अनेक पर्यटक कोकणात फिरण्यासाठी गेले होते. सुट्टी संपल्यानंतर रविवारी सायंकाळपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याने महामार्गावर अचानक वाहनांची संख्या वाढली. त्यातच काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आणि कोंडी अधिकच वाढली.
advertisement
4/5
वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनचालकांना तासन्‌तास एकाच ठिकाणी अडकून राहावे लागले. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी अॅम्ब्युलन्सलाही मार्ग काढताना अडचणी आल्या.
advertisement
5/5
दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, वाहनांची वाढलेली संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली. काही ठिकाणी वाहतूक वळवण्याचे प्रयत्न करण्यात आले, तर स्थानिक प्रशासनानेही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Photo: मुंबई-गोवा महामार्गावर भयानक वाहतूक कोंडी, ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल