TRENDING:

Tips And Tricks : टॅब्लेट्स एक्सपायर झाल्यात? फेकू नका, गोळ्यांसह रॅपरचाही करू शकता 'या' कामात उपयोग

Last Updated:
Reuse of expired medicines and tablets wrappers : आपल्या घरात बऱ्याचदा टॅब्लेट्स पडलेल्या असतात. काहीवेळा घ्यायच्या राहून गेल्या म्हणून उरतात, तर काहीवेळा घ्यायच्या असल्या तेव्हा सापडतच नाही आणि मग नंतर कधीतरी सापडतात. पण तोपर्यंत त्या एक्सपायर झालेल्या असतात. अशा गोळ्यांचा घरात वापर करण्याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
1/7
टॅब्लेट्स एक्सपायर झाल्यात? फेकू नका, गोळ्यांसह रॅपरचाही करू शकता या कामात उपयोग
एक्सापायर झालेल्या गोळ्या खाता येत नसल्या तरी तुम्ही त्यांचा घरातील काही कामांमध्ये वापर करू शकता. फक्त गोळ्यांचं नाही तर तुम्ही त्या गोळ्यांची पाकिटंदेखील वापरू शकता.
advertisement
2/7
गोळ्यांच्या पाकिटाचा वापर तुम्ही जळालेली भांडी, तवे किंवा इतर भांडी स्वच्छ करण्यासाठी करू शकता. यासाठी तुम्हाला गोळ्यांच्या पाकिटाने भांडी खरवडून जळालेले अवशेष काढू शकता. यानंतर भांड्याला चांगली चमक येईल.
advertisement
3/7
तसेच या पाकिटांचा वापर तुम्ही कात्री किंवा मिक्सरच्या भांड्याची ब्लेड धारदार करण्यासाठी वापरू शकता. कात्री आणि मिक्सरच्या ब्लेड्स वापरून वापरून बोथट होतात. त्यांची धार पुन्हा तीक्ष्ण करण्यासाठी तुम्ही या पाकिटांचा वापर करू शकता.
advertisement
4/7
गोळ्यांचे पाकीट म्हणजेच टॅब्लेटचे रॅपर्स पीव्हीसी/पीव्हीडीसी सारख्या मटेरियलसह अॅल्युमिनियम फॉइल लॅमिनेट करून बनवले जातात. त्यांना बारीक धार असते. तुमची कात्री किंवा मिक्सरच्या ब्लेड धार वाढवण्यासाठी हे रॅपर्स शक्य तितक्यावेळा कात्रीने कापा आणि मिक्सरमध्ये फिरवा.
advertisement
5/7
घरात कीटक असतील तर ते घालवण्यासाठी तुम्ही एक्स्पायर झालेल्या गोळ्यांचा वापर करू शकता. तुमच्या सिंकला वास येत असेल किंवा ब्लॉक झाला असेल, तर महागड्या स्प्रेऐवजी या गोळ्या वापरा.
advertisement
6/7
एक्स्पायर झालेल्या गोळ्या कोमट पाण्यात विरघळवा. त्यात थोडा बेकिंग सोडा घाला आणि ते सिंकमध्ये टाका. यामुळे ही समस्या कायमची सुटेल. वनस्पतींवरची बुरशी घालवण्यासाठीही तुम्ही हे मिश्रण वापरू शकता.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : टॅब्लेट्स एक्सपायर झाल्यात? फेकू नका, गोळ्यांसह रॅपरचाही करू शकता 'या' कामात उपयोग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल