TRENDING:

Kitchen Tips : फिल्टरच्या वेस्ट वॉटरचा 'या' पद्धतीने करा वापर, पाण्याचा एक थेंबही जाणार नाही वाया!

Last Updated:
Waste filter water use : बहुतांश लोकांकडे असे वॉटर फिल्टर असतात. जे स्वच्छ पाणी देताना खूप पाणी वेस्ट म्हणून बाहेर काढतात. त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी वाया जातं. पण या पाण्याचा आपण स्मार्ट पद्धतीनं वापर करू शकतो.
advertisement
1/7
फिल्टरच्या वेस्ट वॉटरचा 'या' पद्धतीने करा वापर, पाण्याचा एक थेंबही जाणार नाही वाया!
फिल्टरच वेस्ट वॉटर वापरण्याच्या काही खास टिप्स इथे दिलेल्या आहेत. यांचा वापर केल्यास तुमच्या घरातली बरीच कामही होतील आणि पाणीही वाया जाणार नाही. घरातच या पाण्याचा तुम्ही उत्तमप्रकारे वापर करू शकता.
advertisement
2/7
या पाण्याचा वापर तुम्ही किचनमध्येच चांगल्या प्रकारे करू शकता. भांड्यांचा तेलकटपणा, चिकटपणा आणि मसाले स्वच्छ करण्यासाठी हे पाणी वापरले जाऊ शकते. भांडी घासण्यासाठी तुम्हाला जास्त पाणी लागत असेल तर आधी या पाण्याचा वापर करा.. त्यानंतर शेवटी थोडेसे दस्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये भांडी धुवून ठेवा.
advertisement
3/7
घरातलं वॉशिंग मशीनसुद्धा खूप पाणी वापरतं. अशावेळी घरातल्या पायपुसण्या धुण्यासाठी तुम्ही हे पाणी वापरू शकता. आधी या पाण्यानं पायपुसण्या स्वच्छ करा. शेवटी एकदा चांगल्या पाण्यातून काढा. त्यामुळे पायपुसण्या स्वच्छही होतील आणि तुमचं स्वच्छ पाणी जास्त वाया जाणार नाही.
advertisement
4/7
फिल्टरच्या वेस्ट वॉटरचा वापर तुम्ही फरशी पुसण्यासाठीही करू शकता. फारशी पुसण्यासाठी हे पाणी घ्या आणि त्यामध्ये एखादे फ्लोअर क्लिनर टाकून त्याने फारशी पुसा. पाणी वयही जाणार नाही आणि घरही स्वच्छ होईल.
advertisement
5/7
या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असते म्हणून हे खारट पाणी तुम्ही टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. टॉयलेट स्वच्छ असेल तर काहीवेळा तुम्ही फ्लॅशऐवजीही य पाण्याचा वापर करू शकता. फक्त त्यासाठी एक बदली भरून टॉयलेट मध्ये ठेवा.
advertisement
6/7
कार, सायकल किंवा बाईक धुण्यासाठी हे पाणी वापरलं जाऊ शकतं. या वस्तू धुण्यासाठी खूप पाणी लागतं. अशावेळी चांगलं पाणी वाया घालवण्यापेक्षा तुम्ही फिल्टरचं वेस्ट वॉटर वापरलं. तर पाण्याची बचत होईल आणि तुमचं वाहनही स्वच्छ होईल.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : फिल्टरच्या वेस्ट वॉटरचा 'या' पद्धतीने करा वापर, पाण्याचा एक थेंबही जाणार नाही वाया!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल