TRENDING:

Kids Summer Health : तुमच्या मुलाला नेहमी थकवा जाणवतो का? डॉक्टरांनी व्यक्त केली या 'गंभीर' आजाराची भीती

Last Updated:
Summer Health Tips : घरातील लहान मुलांना देखील सतत थकवा जाणवत असेल किंवा मुलाचा चेहरा आणि शरीर फिकट पडले असेल, तर त्याकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे
advertisement
1/9
तुमच्या मुलाला नेहमी थकवा जाणवतो का? डॉक्टरांनी व्यक्त केली या 'गंभीर' आजाराची भीती
आजकाल अनेक लहान मुलांना सतत थकवा जाणवण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. थोड्याशा हालचालीनंतर किंवा आठ ते 10 पायऱ्या चढल्यानंतर मुलांना धाप लागते. तुमच्या घरातील लहान मुलांना देखील अशी समस्या जाणवत असेल किंवा मुलाचा चेहरा आणि शरीर फिकट पडले असेल, तर त्याकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मुलांमध्ये वारंवार येणाऱ्या थकव्यामागे ॲनिमिया हे कारण असू शकते.
advertisement
2/9
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या वेबसाइटवर प्रकाशित एका संशोधनानुसार, शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सामान्यपेक्षा कमी होते त्या स्थितीला ॲनिमिया असे म्हटले जाते. हिमोग्लोबिन लाल रक्तपेशींमध्ये आढळते आणि त्याचे मुख्य कार्य शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवणे असते. परंतु शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होते तेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि शरीराचे अवयव अनियमित कार्य करतात.
advertisement
3/9
मुलांमध्ये थकवा का येतो? : द हेल्थसाईटने प्रकाशीत केलेल्या वृ्तात डॉ. शैलेंद्र सिंग यांनी सांगितले की, हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यास शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचू शकत नाही. यामुळं मुलांना लवकर थकवा येतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीर योग्यरित्या ऊर्जा निर्माण करू शकत नाही. यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. तसेच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे स्नायूंवर देखील परिणाम होतो. यामुळं मुलांना खेळताना किंवा धावताना लवकर थकवा येतो आणि ते पाय दुखत असल्याच्या तक्रारी करतात.
advertisement
4/9
अॅनिमियामुळे मेंदूवरही होतो परिणाम : ॲनिमियामुळे मेंदूलाही पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे मूल सुस्त आणि कमी अॅक्टिव्ह होते. डॉ. शैलेंद्र यांच्या मते भारतासारख्या देशांमध्ये मुलांमधील ॲनिमियाचे कोणतेही एकच कारण नाही. त्यासाठी अनेक घटक जबाबदार असू शकतात. ॲनिमिया म्हणजे केवळ रक्ताची कमतरता नसते, तर तो हृदयासाठीही एक धोका असतो.
advertisement
5/9
मुलांमधील ॲनिमियाची कारणं कोणती? : भारतीय मुलांच्या आहारात अनेकदा लोहयुक्त पदार्थांची कमतरता असते. ॲनिमियाचे सर्वात मोठे कारण लोहाची कमतरता आहे. हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह आवश्यक असते. मुलांच्या आहारात हिरव्या भाज्या, फळे आणि दुधाचा समावेश नसेल, तर त्यामुळे पोषक तत्वांची कमतरता निर्माण होत नाही. यामुळे ॲनिमियाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेली मुले ऋतू बदलताना अनेकदा आजारी पडतात. वारंवार आजारी पडल्याने शरीर कमजोर होते आणि त्यामुळे ॲनिमिया होऊ शकतो.
advertisement
6/9
या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष : लवकर थकवा येणे, चेहरा फिकट पडणे, चक्कर येणे, धाप लागणे, भूक न लागणे आणि केस गळणे भारतासारख्या देशांमध्ये ॲनिमिया खूप सामान्य आहे. तुमच्या मुलांमध्येही ॲनिमियाची ही लक्षणे दिसत असतील, तर तुम्ही त्यावर काही खास उपाय करू शकता.
advertisement
7/9
मुलांना काय खायला द्यावं : तुमच्या मुलाला ॲनिमिया असेल, तर त्याच्या आहारात पालक, मेथी, बीट, डाळिंब, गूळ, मसूर आणि कडधान्ये अशा लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा. व्हिटॅमिन सी आयर्न शोषणात मदत करते. त्यामुळे व्हिटॅमिन सीसाठी संत्री, लिंबू आणि आवळा मुलांच्या आहारात जोडा.
advertisement
8/9
याशिवाय मनुका, खजूर आणि बदाम यासारखा सुकामेवा देखील शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवतो अशी माहितीही डॉ. शैलेंद्र शर्मा यांनी दिली आहे. परंतु तुमचे मूल ॲनिमियाने ग्रस्त असेल आणि त्याची लक्षणे वाढत असतील, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नक्कीच भेटले पाहिजे.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kids Summer Health : तुमच्या मुलाला नेहमी थकवा जाणवतो का? डॉक्टरांनी व्यक्त केली या 'गंभीर' आजाराची भीती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल