Home Remedy : हाय कोलेस्टेरॉल महिन्याभरात कमी करतील ही 5 घरगुती पेयं, रोज फक्त एक ग्लास प्या..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
वेगवान जीवनशैलीमध्ये बऱ्याचदा आपलं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं. त्याचे दूरगामी परिणाम मात्र आपल्या भोगावे लागतात. मग काही जीवनशैली संबंधित आजार आपल्याला होण्याचा धोका वाढतो. यातीलच एक समस्या म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल. आपल्या शरीरात हे बॅड कोलेस्ट्रॉल हळूहळू वाढत जाते. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट निखिल वत्स यांनी या कोलेस्ट्रॉलवर एक सोपा घरगुती उपाय सुचवला आहे.
advertisement
1/7

आजच्या व्यस्त जीवनाचा आणि जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कुटुंबातील किंवा मित्रमंडळी किंवा कार्यालयात कोणीतरी आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास असल्याचे आढळते.
advertisement
2/7
उच्च कोलेस्टेरॉल हा आता एक सामान्य आजार झाला आहे. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट निखिल वत्स यांनी या कोलेस्ट्रॉलला तोंड देण्यासाठी घरगुती उपाय सुचवला आहे. निखिलच्या मते, असे पाच फळ किंवा भाज्यांचे रस आहेत, जे तुमचे <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/high-cholesterol-problem-will-be-reduced-just-do-these-things-to-keep-heart-healthy-mhpj-1150238.html">कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत</a> करू शकतात. ते कोणते आहेत, चला जाणून घेऊया.
advertisement
3/7
बीटरूट ज्यूस : लोकांमध्ये एक लोकप्रिय समज आहे की, बीटरूटचा रस प्यायल्याने रक्त प्रवाह वाढतो. परंतु त्याचे शरीरासाठी इतर फायदे देखील आहेत. बीटरूटचा रस पिणे शरीरातील अशुद्धता काढून टाकण्यासाठी आणि <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/women-health-chest-pain-bp-these-can-be-beginning-of-this-dangerous-disease-for-women-mhpj-1177829.html">खराब कोलेस्टेरॉल</a> काढून टाकण्यासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.
advertisement
4/7
चिया सीड्स : आजच्या आरोग्याबाबत जागरूक लोकांच्या तोंडून तुम्ही चिया बियांचे नाव ऐकले असेलच. असे मानले जाते की, ते आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. यामुळे वजन तर कमी होतेच पण कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
advertisement
5/7
डाळिंबाचा रस : डाळिंब हे शरीरासाठी सर्वात फायदेशीर फळांपैकी एक मानले जाते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी डाळिंबाचा रस पिण्याची शिफारस केली जाते. याचे सेवन केल्याने खूप आराम मिळतो.
advertisement
6/7
संत्र्याचा रस : आरोग्य जपण्यासाठी संत्र्याचा रस खूप फायदेशीर मानला जातो. याशिवाय संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मिळते, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे डोळ्यांनाही फायदा होतो. त्याचा आपल्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
advertisement
7/7
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Home Remedy : हाय कोलेस्टेरॉल महिन्याभरात कमी करतील ही 5 घरगुती पेयं, रोज फक्त एक ग्लास प्या..