TRENDING:

Pimpri Chinchwad News : "गप्प बस स्टोरी नको सांगू...", एका शब्दावरूनच भर थिएटरमध्ये एकमेकांमध्ये जुंपली...

Last Updated:

Pimpri Chinchwad Crime News : थिएटरमध्ये चित्रपटाची स्टोरी सांगण्यावरून दोघांमध्ये फुल्ल ऑन राडा झालेला आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिंपरी चिंचवडमधील एक थिएटरमध्ये मारामारी झालेली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
थिएटरमध्ये चित्रपटाची स्टोरी सांगण्यावरून दोघांमध्ये फुल्ल ऑन राडा झालेला आहे. सध्या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पिंपरी चिंचवडमधील एक थिएटरमध्ये मारामारी झालेली आहे. नेमक्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी ही घटना घडली आहे, याची माहिती अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. पण एका क्षुल्लक कारणामुळे ही मारामारी झाल्यामुळे नेटकरी या घटनेवर खूप हसत आहेत. अनेकदा आपण चित्रपट पाहायला गेल्यानंतर प्रेक्षक आपआपसात खूप बडबड करताना आपल्याला दिसतात. त्यांच्या बडबडीमुळे इतरत्र लोकांनाही खूप त्रास होताना दिसतो.
Pimpri Chinchwad News : "गप्प बस स्टोरी नको सांगू...", एका शब्दावरूनच भर थिएटरमध्ये एकमेकांमध्ये जुंपली...
Pimpri Chinchwad News : "गप्प बस स्टोरी नको सांगू...", एका शब्दावरूनच भर थिएटरमध्ये एकमेकांमध्ये जुंपली...
advertisement

महाराष्ट्रात अचानक बदलली हवा, मुंबईसह 11 जिल्ह्यांबद्दल नवी अपडेट

थिएटरमध्ये दोन प्रेक्षकांमध्ये, मारामारी झालेल्या प्रकरणाचा गुन्हा चिंचवड पोलिस स्थानकात नोंद करण्यात आला आहे. चिंचवडमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय अभिषेक प्रफुल्ल देशपांडे याने चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. त्याने पिंपरीतील वल्लभनगरमध्ये राहणाऱ्या अकिब जावेद निसार पटेल आणि त्याची पत्नी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारामारीची घटना, शुक्रवारी (५ सप्टेंबर) रात्री साडेआठ ते पावणेदहाच्या सुमारास चिंचवड येथील एलप्रो मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये घडली.

advertisement

खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; RBIमध्ये 120 जागांसाठी भरती

अभिषेक आणि आकिबमध्ये एका शब्दामुळेच वाद झाला आहे. अभिषेक पत्नी आणि बहिणीसोबत चित्रपट पाहायला आला होता. त्यावेळी त्याच्या मागच्या सीटवरील आकिबने अभिषेकला "गप्प बस आधीच स्टोरी नको सांगू..." अशी विनंती केली. यामुळे चिडून आकिबने अभिषेकची कॉलर पकडली. त्यानंतर त्याने अभिषेकला कॉलर पकडून खाली पाडलं. पुढे वादाचं रूपांतर भांडणात झालं.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pimpri Chinchwad News : "गप्प बस स्टोरी नको सांगू...", एका शब्दावरूनच भर थिएटरमध्ये एकमेकांमध्ये जुंपली...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल