या सगळ्यात अनेकांना हा प्रश्न पडतो की उपराष्ट्रपतींना नेमका किती पगार मिळतो आणि त्यांना राहण्यासाठी कुठे घर दिलं जातं?
उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो?
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण उपराष्ट्रपतींना थेट पगार दिला जात नाही. त्याऐवजी ते राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून दरमहा सुमारे 4 लाख रुपये मानधन घेतात. हा पगार संसदेतील अधिकाऱ्यांचे वेतन आणि भत्ते अधिनियम, 1953 नुसार निश्चित केला जातो.
advertisement
मग प्रश्न असा की त्यांना सरकारकडून कार्यकाल संपेपर्यंत निवास स्थान मिळतं का?
उपराष्ट्रपतींसाठी दिल्लीतील 6, मौलाना आजाद रोड येथील अधिकृत निवासस्थान उपलब्ध करून दिले जाते. हा सरकारी बंगला आहे आणि त्यात सर्व आधुनिक सोयी-सुविधा असतात.
घरासोबतच उपराष्ट्रपतीला कोणकोणत्या सुविधा मिळतात?
त्याचा घर सांभाळणं आणि घराची देखभाल देखील सरकारकडून केली जाते. वैद्यकीय सेवा चांगल्यापद्धतीच्या मिळतात. रेल्वे आणि हवाई प्रवासासाठी मोफत सुविधा, लँडलाइन आणि मोबाइल सेवा मिळते. शिवाय वैयक्तिक सुरक्षा आणि स्टाफ देखील मिळतो.
निवृत्तीनंतरच्या सुविधा
उपराष्ट्रपतींना निवृत्तीनंतरही दरमहा सुमारे 2 लाख रुपये पेन्शन, टाइप-8 बंगला, वैयक्तिक सचिव, अतिरिक्त सचिव, वैयक्तिक सहाय्यक, डॉक्टर, नर्सिंग अधिकारी आणि चार सहाय्यक दिले जातात.