Hair Growth : 'या' 5 सोप्या टिप्सने केस होतील लांब आणि शायनी! ट्राय करा कोरियन हेअर रुटीन..
- Published by:
- local18
Last Updated:
Hair Care Routine For Hair Growth : सौंदर्यप्रसाधनांच्या बाबतीत कोरियन लोकांना हरवणे कोणालाही शक्य नाही, हे काही गुपित नाही. जर तुम्हाला सरळ, लांब आणि रेशमी केस हवे असतील, तर काही काही उपायांनी ते शक्य आहे. कोरियन हेअर केअरच्या या 5 टिप्सच्या साहाय्याने तुम्ही निरोगी, लांब आणि शायनी केस मिळवू शकता.
advertisement
1/5

टाळूची स्वच्छता : कोरियन लोक टाळू स्वच्छ करण्यावर खूप लक्ष देतात. यात टाळूला वाफ देऊन, स्क्रब करून आणि धुवून खोलवर साफ केले जाते. यामुळे टाळू स्वच्छ होते आणि केस वाढण्यास मदत होते.
advertisement
2/5
सौम्य शॅम्पू वापरा : असे शॅम्पू निवडा, जे केसांसाठी सौम्य असतील. हानिकारक रसायने असलेले शाम्पू टाळा. तसेच शॅम्पू आणि कंडिशनर एकत्र असलेले उत्पादने वापरू नका. शॅम्पू असा असावा, ज्यामुळे केस कोरडे होणार नाहीत.
advertisement
3/5
कंडिशनर लावण्यापूर्वी केस कोरडे करा : केसांना कंडिशनर लावण्यापूर्वी ते टॉवेलने थोडे कोरडे करा. यामुळे केसांना कंडिशनर चांगले लागते आणि केस कुरळे होत नाहीत. तसेच केसांमध्ये गुंताही होत नाही.
advertisement
4/5
केसांना मॉइश्चराइझ करा : केसांना पुरेसा ओलावा मिळावा यासाठी हेअर मास्क वापरा किंवा 'हायड्रेटिंग हेअर कॅप्स' वापरा. यामुळे केसांना आर्द्रता मिळते आणि ते निरोगी राहतात.
advertisement
5/5
स्कॅल्प टोनर आणि सीरमचा वापर : स्कॅल्प टोनर कोंडा आणि प्रदूषकांपासून लढण्यास मदत करतो. स्कॅल्प सीरम केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतो. 'हेअर एसेन्स' सीरमप्रमाणेच काम करतो, पण तो केसांना चिकट बनवत नाही. या सोप्या टिप्स वापरून तुम्ही निरोगी आणि सुंदर केस मिळवू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Hair Growth : 'या' 5 सोप्या टिप्सने केस होतील लांब आणि शायनी! ट्राय करा कोरियन हेअर रुटीन..