महिलांसाठी नवीन गर्भनिरोधक बाजारात; ना कंडोम, ना गोळी फक्त एक छोटी स्टिक आणि 3 वर्षे नो टेन्शन
- Published by:Devika Shinde
Last Updated:
What is Subdermal Contraceptive Implant : नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आतापर्यंत कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन किंवा कॉपर-टी (Copper-T) यांसारख्या पर्यायांचा वापर केला जात होता. मात्र, अनेकदा गोळ्या घेण्याचे विसरणे किंवा कॉपर-टीमुळे होणारा त्रास यामुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
advertisement
1/8

आधुनिक काळात कुटुंब नियोजनाबाबत समाजात मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी आतापर्यंत कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन किंवा कॉपर-टी (Copper-T) यांसारख्या पर्यायांचा वापर केला जात होता. मात्र, अनेकदा गोळ्या घेण्याचे विसरणे किंवा कॉपर-टीमुळे होणारा त्रास यामुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
advertisement
2/8
जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, आता या सर्व कटकटींपासून सुटका मिळणार आहे आणि तेही एका छोट्या काडीमुळे? हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. विज्ञानाने आता इतकी प्रगती केली आहे की, चक्क हाताच्या त्वचेखाली एक छोटी 'स्टिक' बसवून तुम्ही 3 वर्षांपर्यंत गर्भधारणा रोखू शकता. विशेष म्हणजे, महाराष्ट्रासह भारतातील काही राज्यांमध्ये हा पर्याय आता उपलब्ध झाला आहे.
advertisement
3/8
काय आहे हे नवं गर्भनिरोधक?या नवीन गर्भनिरोधकाला वैद्यकीय भाषेत 'सबडर्मल इम्प्लांट' (Subdermal Implant) असं म्हणतात. हे अत्यंत लहान आकाराचे असून एखाद्या काडीसारखे दिसते. आतापर्यंतचे बहुतेक गर्भनिरोधक हे 'प्रायव्हेट पार्ट'मध्ये किंवा इंजेक्शनद्वारे शरीरात टोचले जात होते. मात्र, हे इम्प्लांट हाताच्या कोपऱ्याजवळील त्वचेच्या अगदी खाली बसवले जाते.
advertisement
4/8
हे काम कसं करतं?हे इम्प्लांट हाताच्या त्वचेखाली बसवल्यानंतर, त्यातून अतिशय सूक्ष्म प्रमाणात 'प्रोजेस्टिन' (Progestin) नावाचे संप्रेरक (Hormone) सतत शरीरात सोडले जाते. हे संप्रेरक प्रामुख्याने दोन प्रकारे काम करते: 1. हे स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया रोखते. 2. गर्भाशयाच्या मुखाशी असलेला द्राव (Mucus) घट्ट करते, ज्यामुळे शुक्राणू आत प्रवेश करू शकत नाहीत.
advertisement
5/8
महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि फायदेएकदा हे इम्प्लांट बसवले की 3 वर्षांपर्यंत तुम्हाला गर्भनिरोधक गोळ्या किंवा इतर कोणत्याही साधनाची गरज भासत नाही. जर महिलेला 3 वर्षांच्या आत मूल हवं असेल, तर ती कधीही डॉक्टरांकडे जाऊन हे इम्प्लांट काढून घेऊ शकते. हे काढल्यानंतर काही दिवसांतच नैसर्गिक गर्भधारणेची क्षमता पुन्हा प्राप्त होते. प्रायव्हेट पार्टमध्ये कटकट नाही, कॉपर-टी प्रमाणे हे गर्भाशयात बसवावे लागत नसल्याने संसर्ग किंवा शारीरिक त्रासाची भीती कमी असते.
advertisement
6/8
महाराष्ट्रात कुठे उपलब्ध आहे?राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या (National Health Mission) माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये तृतीय स्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये (जसे की जिल्हा रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालये) हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या काळात मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमधील सरकारी रुग्णालयांमध्येही याची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.
advertisement
7/8
हे इम्प्लांट बसवण्यासाठी एक छोटी शस्त्रक्रिया (जी केवळ काही मिनिटांची असते) करावी लागते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे करू नये. तसेच, हे केवळ गर्भधारणा रोखते, लैंगिक आजारांपासून (STDs) संरक्षण करत नाही, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
advertisement
8/8
कुटुंब नियोजनाच्या दिशेने 'सबडर्मल इम्प्लांट' हे एक क्रांतिकारी पाऊल ठरत आहे. ज्या महिलांना दीर्घकाळ सुरक्षित आणि कोणत्याही कटकटीविना गर्भनिरोधक हवे आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम आणि आधुनिक पर्याय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
महिलांसाठी नवीन गर्भनिरोधक बाजारात; ना कंडोम, ना गोळी फक्त एक छोटी स्टिक आणि 3 वर्षे नो टेन्शन