Health Tips : चहामध्ये गोडवा आणण्यासाठी जास्त साखर वापरताय? पांढरी की ब्राऊन कोणती चांगली? तज्ज्ञांनी दिली माहिती
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
तुम्हाला माहितीये का बाजारात दोन प्रकारची साखर विक्रीसाठी असते. एक म्हणजे नेहमी वापरतो ती पांढरी साखर आणि दुसरी म्हणजे ब्राऊन शुगर होय.
advertisement
1/5

चहा प्यायला अनेकांना आवडतो. मात्र, चहामध्ये गोडवा आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर केला जातो. चहा बनवताना आपल्याकडे व्हाईट शुगर म्हणजेच पांढरी साखर वापरली जाते.
advertisement
2/5
पण तुम्हाला माहितीये का बाजारात दोन प्रकारची साखर विक्रीसाठी असते. एक म्हणजे नेहमी वापरतो ती पांढरी साखर आणि दुसरी म्हणजे ब्राऊन शुगर होय. सध्या शुगरचा धोका लक्षात घेऊन अनेकांना दोन्हीपैकी कुठली साखर आरोग्यास चांगली असा प्रश्न पडतो? याबाबतच छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/5
केनपासून ब्राऊन शुगर तयार केली जाते. या साखरेमध्ये मोलासेस असल्यामुळे त्याचा रंग आणि थोडीशी चव बदलते. बाकी दोन्ही साखरेतील गुणधर्म सारखेच असतात. या साखरेमुळे आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजच तयार होते.
advertisement
4/5
कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम ब्राऊन शुगरमध्ये असतात. थोड्याफार प्रमाणात मिनरल्स देखील असतात. पांढऱ्या साखरेत मात्र हे सर्व घटक नसतात. हे घटक ब्राऊन शुगरमध्ये असले तरी ते कमी प्रमाणातच असतात. त्यामुळे दोन्ही साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स सारखाच आहे.
advertisement
5/5
ग्लुकोजचे प्रमाण दोन्ही साखर खाल्ल्यानंतर सारखंच पाहायला मिळतं. कॅलरीज देखील सारख्याच असतात. फक्त 19-20 चा फरक आहे. काही पदार्थांमध्ये आपण जर ब्राऊन शुगर वापरली तर थोडा फ्लेवर बदलतो. जसं की डार्क चॉकलेट किंवा ब्राउनीमध्ये त्याचा वापर केल्यास रंग आणि फ्लेवरचा थोडा फरक येतो. तरीही मधुमेह असणाऱ्यांनी दोन्ही प्रकारची साखर न खाणंच चांगलं आहे. तसेच साखरेच्या ऐवजी गूळ किंवा मधाचा वापर देखील करणं फायद्याचं ठरू शकतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : चहामध्ये गोडवा आणण्यासाठी जास्त साखर वापरताय? पांढरी की ब्राऊन कोणती चांगली? तज्ज्ञांनी दिली माहिती