TRENDING:

Pear Side Effects : 'या' लोकांनी नासपती बिलकुल खाऊ नये, नाहीतर फायद्याऐवजी नुकसान जास्त होईल

Last Updated:
नासपती हे फळ पौष्टिकतेने समृद्ध असून यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर आढळतात. यात अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी कॅन्सर गुणधर्म देखील असून नासपती आरोग्य संबंधित अनेक आजार दूर करण्यासाठी देखील परिणाम कारक ठरते. परंतु हीच नासपती काही लोकांसाठी नुकसानदायी देखील ठरू शकते. तेव्हा कोणत्या लोकांनी नासपती खाऊ नये हे जाणून घ्या.
advertisement
1/5
'या' लोकांनी नासपती बिलकुल खाऊ नये, नाहीतर फायद्याऐवजी नुकसान जास्त होईल
जर तुम्हाला आधीपासून पचना संबंधित समस्या असतील तर त्यांनी नासपती खाणे टाळावे. नाशपातीच्या कूलिंग इफेक्टमुळे ते पचनशक्ती कमी करते त्यामुळे खराब पचनाची समस्या असलेल्या लोकांना नासपती पचवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. पचना संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी नासपती खाल्ल्यास पोटात दुखणे, गॅस, ब्लोटिंग, जुलाब यासारख्या समस्या होऊ शकतात.
advertisement
2/5

3/5
सर्दी, ताप, खोकला असलेल्या व्यक्तींनी नासपती खाऊ नये. नाशपातीचा प्रभाव हा थंड असतो. तेव्हा असे आजार असलेल्या व्यक्तींनी जर नाशपती खाल्ली तर त्यांची समस्या अधिक वाढू शकते.
advertisement
4/5
जर तुम्हाला नासपतीची एलर्जी असेल तर चुकूनही त्याचे सेवन करू नका. असे केल्याने चेहरा, घसा आणि जिभेवर सूज येण्यासारखी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय जर तुम्हाला नासपतीची एलर्जी असेल, तर त्वचेला खाज सुटणे, सायनस तसेच उलट्या आणि जुलाब यासारख्या समस्याही तुम्हाला होऊ शकतात.
advertisement
5/5
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले अनेकजण नासपतीमध्ये कमी कॅलरीज असल्याने त्याचे जास्त सेवन करतात. परंतु जास्त प्रमाणात नासपती खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीज जास्त होऊ शकतात. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Pear Side Effects : 'या' लोकांनी नासपती बिलकुल खाऊ नये, नाहीतर फायद्याऐवजी नुकसान जास्त होईल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल