Uric Acid: युरिक ॲसिड वाढवण्यासाठी या डाळी ठरतात कारणीभूत, पाहा तज्ज्ञ काय सांगतात
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
शरीरात वाढलेले युरिक ॲसिड अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते. आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास युरिक ॲसिडची समस्या कमी होऊ शकते. मात्र असेही काही पदार्थ आहेत ज्यामुळे ही समस्या वाढू शकते.
advertisement
1/7

शरीरात वाढलेले युरिक ॲसिड अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते. यामुळे सांधे आणि हाडांमधील वेदना वाढू लागतात. तसेच शरीराच्या वेगवेगळ्या भागांना सूज येते. हाता-पायाच्या बोटांमध्येही वेदना जाणवू लागते.
advertisement
2/7
अशा परिस्थितीत आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास युरिक ॲसिडची समस्या कमी होऊ शकते. मात्र असेही काही पदार्थ आहेत ज्यामुळे ही समस्या वाढू शकते.
advertisement
3/7
शरीरात युरिक ॲसिड वाढण्याची अनेक कारणे आहेत. यातीलच एक कारण म्हणजे हाय प्रोटीन आणि प्यूरिन असलेल्या पदार्थांचे सेवन.
advertisement
4/7
आपण खात असलेल्या डाळीही शरीरातील युरिक ॲसिड वाढवू शकते. अशा परिस्थितीत आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. या डाळी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
advertisement
5/7
युरिक ॲसिड असलेल्या रुग्णांनी उडीद डाळीचे सेवन करू नये. या डाळीमध्ये प्यूरिनचे प्रमाण खूपच जास्त असते.
advertisement
6/7
चण्याच्या डाळीतही प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे शरीरातील युरिक ॲसिडची समस्या वाढू शकते. म्हणून रुग्णांनी या डाळीचे सेवन करू नये.
advertisement
7/7
मसूर डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूपच जास्त असते. म्हणूनच युरिक ॲसिड असलेल्या रुग्णांनी या डाळीचे सेवन करू नये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Uric Acid: युरिक ॲसिड वाढवण्यासाठी या डाळी ठरतात कारणीभूत, पाहा तज्ज्ञ काय सांगतात