'या' ट्रिकने 5-6 दिवस ताजी राहील केळी! एकदा ट्राय करुन पाहाच
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
How to prevent ripening of bananas: अनेकदा आपण जास्त केळी घरी आणतो. ती लवकर खाल्ली नाही तर काळी पडते. अशा वेळी ते खायच्या कामाचे राहत नाही. यासाठीच आज आपण एक सोपी ट्रिक जाणून घेणार आहोत.
advertisement
1/6

केळी हे फळ अनेकांना आवडतं. स्वस्त असल्याने लोक हे खूप खातात. हे फळ अनेक पोष्टीक गुणांनी भरपूर असते. यात पोटॅशियम, डायटरी फायबर, आयरन, मॅग्नीशियम, व्हिटॅमिन सी, बी 6, कार्बोहायड्रेट असतात. जे आरोग्यासाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स आहेत. केळी खाल्ल्याने शरीराला तत्काळ एनर्जी मिळते. पोटॅशियम हार्टला हेल्दी ठेवते.
advertisement
2/6
फायबर पचनक्रियेला निरोगी ठेवते. बद्धकोष्ठता दूर करते. सोबतच केळी खाल्ल्याने असे अनेक फायदे होतात. अनेकदा तुम्ही मार्केटमधून पिकलेली केळी खरेदी करत असाल. अनेकदा घरी आणता. पण 3-4 खाल्ल्यानंतर बाकीचे पडलेले राहतात. हळुहळू ते खराब होतात. पिवळं साल हे काळ पडू लागतं. अशावेळी ते खाण्यायोग्य राहत नाही आणि तुम्ही ते खराब समजून फेकून देता. यामुळे केळी वाया जातात.
advertisement
3/6
केली काळी पडू नये यासाठी आज आपण एक ट्रिक पाहणार आहोत. प्रसिद्ध मास्टर शेफ पंकज भदोरिया यांनी काही सिंपल हॅक्स आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले आहे. चला एकदा जाणून घेऊया.
advertisement
4/6
अनेकदा केळी दोन-तीन दिवसात काळ्या पडतात. खूप जास्त पिकून जातात. केळी जास्त पिकू नयेत यासाठी तुम्हाला अॅल्यूमीनियम फॉइल किंवा प्लास्टिक शीट किंवा रॅप लागेल.
advertisement
5/6
घरात सामान्यतः अॅल्यूमिनियम फॉइल असतात. कारण तुम्ही लंच बॉक्समध्ये फूड्स रॅप करण्यासाठी वापरत असाल. ते कसं करायचं याविषयी आपण जाणून घेऊया.
advertisement
6/6
आता एक रुंग अॅल्यूमीनियम फॉइल किंवा प्लास्टिक शीट घ्या. हे केळीच्या घडाच्या स्टेमवर टाकून चांगल्या प्रकारे गुंडाळून कव्हर करा. हे रबर किंवा दोऱ्याने बांधा. असं केल्याने स्टेमवर हवेचा कॉन्टॅक्सट पूर्णपणे संपतो. हवा लागली नाही तर केळी लवकर पिकत नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही केळी जास्त दिवस फ्रेश ठेवू शकता.