iphone 17 घ्यायचा! भारतात इतकी असेल किंमत, अधिकृत आकडे समोर, 82 हजार ते....
- Published by:Sachin S
Last Updated:
ॲपल कंपनीने अखेर बहुप्रतिक्षित आयफोन 17 सीरिज लाँच केली आहे. यामध्ये iPhone 17 air, iPhone 17 आणि iPhone 17 max Pro चा समावेश आहे.
advertisement
1/9

आयफोन नावाने अवघ्या जगाला प्रेमात पाडणाऱ्या ॲपल कंपनीने अखेर बहुप्रतिक्षित आयफोन 17 सीरिज लाँच केली आहे. यामध्ये iPhone 17 air, iPhone 17 आणि iPhone 17 max Pro चा समावेश आहे. आता नवी iPhone 17 मध्ये काय असणार याची उत्सुकता सर्व मोबाईल वापरकर्त्यांना लागली होती
advertisement
2/9
iPhone 17 air, iPhone 17 आणि iPhone 17 max Pro लाँच होताच किती किंमत असेल याबद्दल चर्चा रंगली आहे. पण, apple ने भारतात किती किंमत असेल हे त्यांच्या साईटवर जाहीर केलं आहे.
advertisement
3/9
जर तुम्ही आयफोन १७ घेण्याचा प्लॅन करत असाल तर 256 GB स्टोरेजमध्ये हा फोन उपलब्ध आहे. याची किंमत भारतात 82 हजारांपासून सुरू होईल. तर 512 GB स्टोरेज फोन घ्यायचा असेल तर 102900 रुपये किंमत असणार आहे.
advertisement
4/9
apple ने आता सगळ्यात पातळ असा iphone air लाँच केला आहे. हा सगळ्यात स्लिम असा फोन आहे, आता स्लिम असेल म्हणून किंमतही तशीच आहे. या फोनची किंमत 256 GB साठी 1 लाख 19 हजार 900 रुपयांपासून सुरू होते, 512 GB ची किंमत 139900 रुपये इतकी आहे. तर 1 टीबीची किंमत 159900 रुपये इतकी आहे.
advertisement
5/9
जर तुम्हाला आयफोन 17 pro max विकत घ्यायचा असेल तर जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवा. १ लाख ४९ हजार ९०० रुपये किंमत आहे. तर आयफोन १७ pro ची किंमत 1 लाख ३४ हजार ९०० रुपये आहे.
advertisement
6/9
apple चा अपग्रेडेड A19 चिप नवीन आयफोन १७ मध्ये देण्यात आली आहे. हा सहा-कोर प्रोसेसर पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि डिव्हाइसवरील AI प्रक्रिया जलद करतो. कंपनीचा दावा आहे की, यामुळे मल्टीटास्किंग, गेमिंग आणि मशीन लर्निंग कार्ये अधिक सुरळीत होतील.
advertisement
7/9
iPhone 17 आता पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली चार्जिंग सपोर्टसह येत आहे. अया फोनमध्ये १२-मेगापिक्सेल ऑप्टिकल दर्जाचा टेलिफोटो कॅमेरा आणि ४८-मेगापिक्सेलचा प्राथमिक फ्यूजन कॅमेरा आहे. कंपनीच्या मते, आयफोन १७ एका चार्जवर सुमारे ८ तास जास्त व्हिडिओ प्लेबॅक लाइफ देतो आणि जलद चार्जिंग सुविधा देखील आहे.
advertisement
8/9
apple कंपनीने आयफोनसाठी आता Pre order सुद्धा सुरू केली आहे. 12 सप्टेंबरपासून ऑर्डर बूक करता येईल. त्यानंतर फोन हा 19 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे.
advertisement
9/9
iPhone 17 Air फोनमध्ये Apple चं नवीन A19 Pro चीप लावण्यात आली आहे. जी स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये सर्वात पॉवरफुल आहे ही चिप ऑन-डिवाआस AI प्रोसेसिंगला सपोर्ट करतोय, ज्यामुळे अॅप्स आणि गेम आरामात खेळता येईल. iPhone 17 Air हा चार रंगात उपलब्ध आहे. iPhone स्लिम आणि स्टायलिश श्रेणीची नवीन आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
iphone 17 घ्यायचा! भारतात इतकी असेल किंमत, अधिकृत आकडे समोर, 82 हजार ते....