TRENDING:

एकाच दिवशी रिलीज झालेल्या 7 फिल्म्स, सगळ्या फ्लॉप; बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस

Last Updated:
Bollywood Flop Film : पण तुम्हाला माहिती आहे बॉलिवूडच्या इतिसहासातील असा एक दुर्दैवी दिवस ज्या दिवशी फिल्म रिलीज झाल्या, त्या सगळ्या फ्लॉप ठरल्या.
advertisement
1/9
एकाच दिवशी रिलीज झालेल्या 7 फिल्म्स, सगळ्या फ्लॉप; बॉलिवूडसाठी सर्वात दुर्दैवी दिवस
शुक्रवार म्हणजे फिल्म इंडस्ट्रीसाठी महत्त्वाचा दिवस. यादिवशी फिल्म रिलीज केल्या जातात. दरवर्षी असंख्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होतात. काही हिट ठरतात, तर काही फ्लॉप ठरतात. पण एक असा दिवस ज्या दिवशी रिलीज झालेल्या फिल्म्स फ्लॉप ठरल्या आहेत.
advertisement
2/9
यातील पहिली 27 वर्षांपूर्वी 1999 साली आग ही आग ही फिल्म. टीएलव्ही प्रसाद दिग्दर्शित या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, आलोकनाथ दीक्षित, पायल मल्होत्रा ​​आणि राजीव राय यांनी भूमिका केल्या होत्या.  मीडिया रिपोर्टनुसार फिल्मचं बजेट 2 कोटी होतं. पण फक्त 1.15 कोटींची कमाई झाली.
advertisement
3/9
त्याच दिवशी रिलीज झालेली दुसरी फिल्म काला साम्राज्य. अ‍ॅक्शन-क्राइम आणि रोमँटिक फिल्म. यात सुनील शेट्टी, मोनिका बेदी आणि अमरीश पुरी यांनी भूमिका केल्या होत्या. ही फिल्मही प्रदर्शित होताच फ्लॉप झाली.
advertisement
4/9
2010 साली आलेली हाइड अँड सीक फिल्म एक रहस्यमयी थ्रीलर. शॉन अरहना यांनी याचं दिग्दर्शन केलं होतं तर अर्जन बाजवा, पूरब कोहली, मृणालिनी शर्मा हे कलाकार होते. ही फिल्म फ्लॉप झाली.
advertisement
5/9
याच वर्षातील ना घर के ना घाट के ही फिल्म, राहुल अग्रवाल दिग्दर्शित एक कॉमेडी ड्रामा. यात नीना गुप्ता, रवी किशन आणि परेश रावल होते.  पण कॉमेडी असूनही ही फिल्म प्रेक्षकांचं मन जिंकण्यात फेल ठरली.
advertisement
6/9
सनी देओलची 2010 सालातील राइट या राँग फिल्म, ज्यात कोंकणा सेन शर्मा आणि ईशा कोप्पीकर या अभिनेत्री होत्या. नीरज पाठक दिग्दर्शित या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. रिपोर्टनुसार 22 कोटींचं बजेट असलेली ही फिल्म बजेट वसूल करू शकली नाही.
advertisement
7/9
अर्शद खान दिग्दर्शित 2010 मध्ये प्रदर्शित झालेली ट्रम्प कार्ड ही थ्रीलर फिल्म यात विक्रम कुमार आणि उर्वशी चौधरी यांनी भूमिका केल्या. पण हा फिल्मही काही आपला थरार दाखवू शकला नाही. तो फ्लॉप झाला.
advertisement
8/9
काही वर्षांपूर्वीच म्हणजे 2021 साली आलेला 'टाइम टू डान्स'. कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ आणि सूरज पंचोलीची डान्सवर आधारित ही फिल्म. या फिल्मलाही लगेच डिसास्टरचा टॅग मिळाला.
advertisement
9/9
गेल्या 27 वर्षांत रिलीज झालेल्या या 7 फिल्म. फिल्ममध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे त्यांच्या रिलीजची डेट. 12 मार्च. या सगळ्या फिल्मस याच दिवशी प्रदर्शित झाल्या आणि त्या फ्लॉप ठरल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एकाच दिवशी रिलीज झालेल्या 7 फिल्म्स, सगळ्या फ्लॉप; बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल