TRENDING:

पायांमध्ये लपलाय करोडपती होण्याचा योग, जर तळव्यांवर असेल 'हे' खास चिन्ह; झटपट व्हाल मालामाल!

Last Updated:
सामुद्रिक शास्त्रानुसार, माणसाच्या शरीराची बनावट, हातावरील रेषा आणि पायांच्या तळव्यावरील निशाण त्याच्या भविष्याबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल बरेच काही सांगून जातात.
advertisement
1/7
पायांमध्ये लपलाय करोडपती होण्याचा योग, जर तळव्यांवर असेल 'हे' खास चिन्ह; झटपट व्हाल मालामाल!
सामुद्रिक शास्त्रानुसार, माणसाच्या शरीराची बनावट, हातावरील रेषा आणि पायांच्या तळव्यावरील निशाण त्याच्या भविष्याबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल बरेच काही सांगून जातात. अनेकदा आपण हाताच्या रेषांकडे लक्ष देतो, पण ज्योतिषशास्त्रानुसार पायांच्या तळव्यामध्ये 'करोडपती' होण्याचे योग दडलेले असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या पायाच्या तळव्यावर विशिष्ट निशाण असतील, तर ती व्यक्ती केवळ श्रीमंतच होत नाही, तर समाजात तिला अफाट मान-सन्मान मिळतो.
advertisement
2/7
कमळाचे चिन्ह: पायाच्या तळव्यावर कमळाचे चिन्ह असणे अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानले जाते. ज्या व्यक्तीच्या पायावर हे निशाण असते, तिच्यावर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि ती व्यक्ती राजेशाही थाटात आपले जीवन व्यतीत करते.
advertisement
3/7
स्वस्तिक किंवा चक्राचे निशाण: तळव्याच्या मध्यभागी स्वस्तिक किंवा चक्राचे चिन्ह असणे हे चक्रवर्ती योगाचे लक्षण आहे. अशा व्यक्ती राजकारणात किंवा प्रशासकीय सेवेत उच्च पदे भूषवतात. या निशाणामुळे व्यक्तीला जगभरात प्रसिद्धी मिळते आणि लोक त्यांच्या निर्णयांचा आदर करतात.
advertisement
4/7
शंखाचे चिन्ह: ज्यांच्या पायावर शंखाचे निशाण असते, ते लोक खूप भाग्यवान मानले जातात. अशा व्यक्तींना प्रवासाची आवड असते आणि ते व्यापाराच्या निमित्ताने देश-विदेशात फिरून बक्कळ पैसा कमावतात. त्यांच्या आयुष्यात सुख-सुविधांची रेलचेल असते आणि ते आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारचे सुख देतात.
advertisement
5/7
मऊ आणि गुलाबी तळवे: चिन्हांव्यतिरिक्त पायाचा रंग आणि पोत देखील महत्त्वाचा असतो. ज्यांचे पाय मऊ, मांसल आणि गुलाबी रंगाचे असतात, त्यांचे नशीब खूप प्रबळ असते. असे पाय असलेल्या व्यक्तींना कमी कष्टांत जास्त यश मिळते. याउलट कोरडे आणि फाटलेले पाय दारिद्र्याचे लक्षण मानले जाते.
advertisement
6/7
पाय उचलल्यावर पडणारा खड्डा: जर पाय जमिनीवर टेकवल्यावर तळव्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडत असेल, तर अशा व्यक्ती अत्यंत बुद्धिमान आणि धोरणी असतात. त्या स्वतःच्या हिंमतीवर शून्यातून विश्व निर्माण करतात. अशा लोकांकडे विलासी वाहने आणि स्वतःचे मोठे घर असण्याचे प्रबळ योग असतात.
advertisement
7/7
सरळ आणि स्पष्ट रेषा: पायाच्या अंगठ्यापासून टाचेपर्यंत जाणारी एखादी सरळ आणि स्पष्ट रेषा असेल, तर ती व्यक्ती करोडपती होते. ही रेषा जितकी खोल आणि स्पष्ट असेल, तितकी त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत असते. अशा व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याचे योग वारंवार येतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
पायांमध्ये लपलाय करोडपती होण्याचा योग, जर तळव्यांवर असेल 'हे' खास चिन्ह; झटपट व्हाल मालामाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल