TRENDING:

Nail Extension Disadvantages : तुम्हीही नेल एक्सटेन्शन वापरता? 'ही' चूक टाळा, नाहीतर नखांसोबत तुमची त्वचाही होईल डॅमेज!

Last Updated:
Side effects of nail extension : हल्ली मेकअप आणि फॅशनच्या खूप नव्या नव्या गोष्टी रोज समोर येत असतात. फॅशन रोज बदलत असते. आपला संपूर्ण लूक आणखी सुंदर बनवण्यासाठी मुली हातांच्या नखांनाही तितकंच सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात. नखं लांब बनवण्यासाठी काही मुली नेल एक्स्टेंशन वापरतात. पण हे नेल एक्सटेन्शन खरंच सुरक्षित असतं का?
advertisement
1/7
तुम्हीही नेल एक्सटेन्शन वापरता? 'ही' चूक टाळा, नाहीतर नखांसोबत तुमची त्वचाही होईल डॅमेज!
नेल एक्सटेन्शन आणि अ‍ॅक्रेलिक नखे आता एक फॅशन बनली आहे. यामुळे नखं लांब, चमकदार आणि स्टायलिश दिसतात. मात्र अनेक तज्ज्ञांचं याविषयी चांगलं मत नाही. काही तज्ज्ञांच्या मते, याचा वारंवार वापर केल्याने त्वचा आणि नखांवर वाईट परिणाम होऊ शकतो. कारण यामध्ये यूव्ही लाईट आणि काही रसायनं वापरली जातात.
advertisement
2/7
ऑन्कोलॉजी सर्जन डॉ. जय आर. अनम यांनी एचटीला सांगितलं की, अ‍ॅक्रेलिक नखं सुंदर दिसतात आणि जास्त काळ टिकतातही. मात्र प्रॉब्लेम या नखांमध्ये नाही, तर हे लावण्याच्या पद्धतीत आहे
advertisement
3/7
तज्ज्ञांनी सांगितलं की, या प्रक्रियेत एक विशेष पावडर आणि द्रव पदार्थ मिसळून लावले जातात. नंतर ते यूव्ही लाईटखाली कडक केले जातात. हा यूव्ही लाईट तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. कारण यूव्हीए किरण त्वचेच्या पेशींच्या डीएनएला नुकसान पोहोचवू शकतात.
advertisement
4/7
या यूव्ही लाईटच्या दीर्घकाळ वापराने त्वचेच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांनी हेदेखील सांगितलं की, कधीकधी केलेले नेल एक्सटेन्शन धोकादायक मानले जात नाही. मात्र जास्त काळ याचा सतत वापर करू नये.
advertisement
5/7
काही संशोधनानुसार, शेकडो वेळा यूव्ही लाईटच्या वापरामुळे त्वचेवर परिणाम होऊ शकतात. तसेच अनेक अ‍ॅक्रेलिक उत्पादनांमध्ये हानिकारक रसायनं असू शकतात, ज्यामुळे त्वचेची जळजळ किंवा अ‍ॅलर्जी होऊ शकते. ही रसायनं यूव्ही रेजसोबत आल्यास त्वचेवर जास्त वाईट परिणाम होऊ शकतो.
advertisement
6/7
जर तुम्हाला नेल एक्सटेन्शन करायचेच असेल तर खबरदारी घेऊन तुम्ही ते करू शकता. तज्ञांच्यामते, नेल एक्सटेन्शन करण्यापूर्वी बोटांना सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन ना लावण्याची चूक अजिबात करू नका. शिवाय शक्य असल्यास साध्या यूव्ही लॅम्प्सऐवजी एलईडी लॅम्प्स वापरा.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Nail Extension Disadvantages : तुम्हीही नेल एक्सटेन्शन वापरता? 'ही' चूक टाळा, नाहीतर नखांसोबत तुमची त्वचाही होईल डॅमेज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल