आधी हिला हाकला! अनुश्रीने असं काय केलं? पुन्हा भडकले प्रेक्षक; Bigg Boss Marathi 6 मधून बाहेर काढण्याची मागणी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Anushree Mane : बिग बॉस मराठी 6 च्या सुरुवातीला ट्रोल झालेली अनुश्री माने नंतर आपल्या वागण्यात बदल करून सगळ्यांची मनं जिंकायला लागली होती. पण आता तिच्या वागण्याने ती पुन्हा ट्रोल होते आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 ला जेव्हा सुरुवात झाली तेव्हाच अनुश्री माने प्रेक्षकांना खटकू लागली. अनुश्रीचं वागणं काही कुणाला पटलं नव्हतं. यावरून भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनेही तिची शाळा घेतली होती. त्यानंतर अनुश्रीने तिच्या वागण्यात बदल केला आणि सगळ्यांना तिचा गेम आवडू लागला, तिचं कौतुक होऊ लागलं.
advertisement
2/7
पण आता अनुश्रीने पुन्हा असं काही केलं आहे की त्यामुळे ती पुन्हा ट्रोल होऊ लागली आहे. हिला आधी हाकला असं म्हणजे बहुतेकांनी तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे.
advertisement
3/7
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडच्या प्रोमोत अनुश्री आणि दिपाली यांच्यात वाद झालेला पाहायला मिळतोय. या वादावरूनच अनुश्रीला ट्रोल करण्यात आलं आहे.
advertisement
4/7
किचन सिंकमध्ये भांड्यांचा ढिग पडलेला असतो, यावर दिपाली अनुश्रीला तू हे घासणार आहेस ना? असं विचारते. यावर अनुश्री म्हणजे ज्यांची ड्युटी आहे त्यांना प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला काय करायचं आहे.
advertisement
5/7
पुढे ती सांगते अजून मी दहा आठवडे धुणार नाही. यावर दिपाली तिला कशाला राहतेस इथं असं विचारते. यावर अनुश्री उद्धटपणे दिपाली कशाला राहतेस म्हणजे तू खायला घालतेस का मला, राखणदारीचं काम कर तिथं गप्पपणे असं म्हणते.
advertisement
6/7
अनुश्रीचं दिपालीसोबतचं हे वागणं, बोलणं प्रेक्षकांना खटकलं आहे. त्यामुळे आता पुन्हा तिला घराबाहेर काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
advertisement
7/7
तर काही नेटिझन्सनी दिपाली सय्यद गेम चांगल्या खेळत नाहीत, असं म्हणून त्यांना घराबाहेर काढण्याची डिमांड केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आधी हिला हाकला! अनुश्रीने असं काय केलं? पुन्हा भडकले प्रेक्षक; Bigg Boss Marathi 6 मधून बाहेर काढण्याची मागणी