Tejashri Pradhan : वर्षभरात मोडला संसार, डिवोर्सच्या 10 वर्षानंतरही सिंगल; ही व्यक्ती आहे तेजश्री प्रधानची सपोर्ट सिस्टीम
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Tejashri pradhan Support System : अभिनेत्री तेजश्री प्रधान डिवोर्सनंतर गेली 10 वर्ष सिंगल आयुष्य जगतेय. अभिनेत्रीनं नुकत्याच एका पोस्टमधून तिची सपोर्ट असलेल्या व्यक्तीसोबत फोटो शेअर केला आहे.
advertisement
1/8

वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. मराठी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.
advertisement
2/8
तेजश्री तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे. 2014 साली तिचं लग्न अभिनेता शशांक केतकरबरोबर झालं होतं. पण ते नात फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या वर्षभराने म्हणजेच 2015 साली शशांक आणि तेजश्री यांचा डिवोर्स झाला. गेली तब्बल 10 वर्ष तेजश्री सिंगल आयुष्य जगत आहे.
advertisement
3/8
या काळात तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. करिअरच्या प्रवासातही अनेक बदल झाले. मात्र या सगळ्या प्रवासात तिच्या आयुष्यात एक व्यक्ती कायम खंबीरपणे उभी राहिली आहे.
advertisement
4/8
अलीकडेच तेजश्रीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या आयुष्यातील या खास व्यक्तीबद्दल सांगितलं. ही व्यक्ती तेजश्रीसाठी तिची सपोर्ट सिस्टिम असल्याचं देखील तिनं सांगितलं.
advertisement
5/8
तेजश्रीनं पोस्टमध्ये लिहिलंय "यार… लवकर फोटो पोस्ट करू शकलो नाही कारण नेहमीप्रमाणे आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी तयार करण्यात बिझी होतो. थोडक्यात सांगायचं तर 'तेरा यार हूँ मैं…' विषय संपला! बाकी वाढदिवस तर आनंदात गेला, आता येणारं नवं वर्षही तितकंच आनंदी जाऊ दे. माय डार्लिंग सपोर्ट सिस्टिम हॅप्पी बर्थडे."
advertisement
6/8
तेजश्री प्रधानच्या आयुष्यातील ती जवळची व्यक्ती म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर. तेजश्री आणि शिवानी दोघीही मराठी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असल्या तरी त्यांच्यातील मैत्री खूप घट्ट आहे. व्यस्त करिअर असूनही दोघी एकमेकींसोबत वेळ घालवत असतात.
advertisement
7/8
याआधीही त्यांनी पावसाळ्यातील ट्रेकिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या फोटोंनाही चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती. आता शिवानीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे.
advertisement
8/8
अनेकांनी दोघींच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. एकाच क्षेत्रात काम करत असतानाही स्पर्धेपेक्षा मैत्री जपतानापाहून चाहत्यांनाही आनंद व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejashri Pradhan : वर्षभरात मोडला संसार, डिवोर्सच्या 10 वर्षानंतरही सिंगल; ही व्यक्ती आहे तेजश्री प्रधानची सपोर्ट सिस्टीम