TRENDING:

नशीब चमकणार! सूर्याचं होणार 'या' शुभ नक्षत्रात गोचर, 4 राशींच्या आयुष्यात राजयोगासारखं सुख

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य दर 15 दिवसांनी आपले नक्षत्र बदलतो. चैत्र नवरात्रीच्या एक दिवस आधी, म्हणजेच 18 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी सूर्य देव शनीच्या अधिपत्याखाली असलेल्या 'या' नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.
advertisement
1/6
नशीब चमकणार! सूर्याचं होणार 'या' शुभ नक्षत्रात गोचर, 4 राशींच्या आयुष्यात राजयोगासारखं सुख
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य दर 15 दिवसांनी आपले नक्षत्र बदलतो. चैत्र नवरात्रीच्या काही दिवस आधी, म्हणजेच 18 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी सूर्य देव शनीच्या अधिपत्याखाली असलेल्या 'उत्तर भाद्रपद' नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. सूर्य आणि शनीमध्ये शत्रुत्वाचा भाव असला तरी, उत्तर भाद्रपद हे नक्षत्र स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
advertisement
2/6
सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन 4 राशींच्या जातकांसाठी 'राजयोग' सदृश सुख घेऊन येणार आहे. या काळात या राशींना केवळ आर्थिक लाभच नाही, तर समाजात मोठे पद आणि प्रतिष्ठा मिळण्याचे प्रबळ योग आहेत.
advertisement
3/6
मेष - परदेश व व्यापारातून प्रचंड नफा: सूर्याचे हे गोचर मेष राशीच्या जातकांसाठी परदेशाशी संबंधित कामात मोठे यश देणारे ठरेल. जे लोक आयात-निर्यातीचा व्यवसाय करतात, त्यांना मोठा आर्थिक लाभ होईल. सरकारी क्षेत्रात अडकलेली कामे मार्गी लागतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्याने तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल.
advertisement
4/6
सिंह - पद-प्रतिष्ठा आणि प्रगती: सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्य असल्याने हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते. तुमच्या नेतृत्वाखाली केलेले प्रकल्प यशस्वी होतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे यश मिळेल.
advertisement
5/6
वृश्चिक - सुख-सोयींवर धनाचा वर्षाव: सूर्याच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या जातकांच्या सुख-सोयींमध्ये वाढ होईल. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. गुंतवणुकीतून तुम्हाला अनपेक्षित परतावा मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुम्ही एखादा नवीन व्यवसाय आत्मविश्वासाने सुरू करू शकाल.
advertisement
6/6
कुंभ - आत्मविश्वास आणि धनवृद्धी: जरी कुंभ राशीत शनीची साडेसाती सुरू असली, तरी सूर्याचे शनीच्या नक्षत्रातील हे गोचर तुम्हाला धैर्य प्रदान करेल. तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतील. दीर्घकाळापासून रखडलेले पैसे परत मिळतील. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील, ज्यामुळे तुम्हाला विशेष सवलती किंवा बोनस मिळू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
नशीब चमकणार! सूर्याचं होणार 'या' शुभ नक्षत्रात गोचर, 4 राशींच्या आयुष्यात राजयोगासारखं सुख
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल