TRENDING:

भारताच्या फाळणीमुळे तुटलेली प्रेमकहाणी रूपेरी पडद्यावर, झळकणार हे कलाकार, Teaser

Last Updated:

दिलजीत दोसांझ आणि शर्वरी वाघ स्टारर, 'मैं वापस आऊंगा' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. स्वातंत्र्यकाळात झालेल्या प्रेमीयुगलांवर आधारित चित्रपटाची लव्हस्टोरी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिलजीत दोसांझ आणि शर्वरी वाघ स्टारर, 'मैं वापस आऊंगा' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 1947 मध्ये झालेल्या भारत- पाकिस्तानमध्ये अनेक प्रेमी युगलांच्या प्रेमाची ताटातुट झाल्याचे आपण ऐकून होतो. त्याच कथानकावर आधारित 'मैं वापस आऊंगा' चित्रपट आहे. एका लव्हस्टोरी वर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये शर्वरी वाघ, दिलजीत दोसांझ, नसीरुद्दीन शाह आणि वैदांग रैना या स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत आहेत. 1 मिनिट 13 सेकंदाच्या टीझरने अनेक फॅन्सचे लक्ष वेधले असून सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीझरची जोरदार चर्चा होत आहे.
News18
News18
advertisement

'मैं वापस आऊंगा' चित्रपटाचे कथानक भारत- पाकिस्तान विभाजनाच्या दरम्यानचे आहे. टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून शर्वरी आणि वेदांगची लव्हस्टोरी फॅन्सला पाहायला मिळणार आहे. शर्वरी आणि वेदांगच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले असून त्यांच्या लव्हस्टोरीची फॅन्समध्ये जोरदार चर्चा होत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटामध्ये दिग्दर्शकांनी एक लव्हस्टोरीच दाखवली नसून भावानांचेही दर्शन दिसत आहे. चित्रपटाची शुटिंग पंजाबमध्ये झाली असून सीमेच्या शेजारील राज्यातील लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

advertisement

https://youtu.be/dvQgE-8noLs?si=52iasNyjUSwbEOYY

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा मोठा फटका, ऐन हंगामात टरबूजाचे दर 22 वरून 8 वर, शेतकऱ्याचा खर्च निघणे अवघड
सर्व पहा

इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाले आहे. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ए. आर. रहमान यांच्याकडे आहे. 'मैं वापस आऊंगा' च्या कथानकाबद्दल सांगताना इम्तियाज अली यांनी सांगितले की, " 'मैं वापस आऊंगा' हा चित्रपट स्थलांतर आणि फाळणीनंतरच्या भावनांपासून प्रेरित आहे. प्रेम खरोखरच हरवता येते का? एखाद्याच्या हृदयात निर्माण केलेली जागा खरोखर काढून घेता येते का? अशी कथा पडद्यावर जिवंत करण्याची संधी मिळाल्याने मी भाग्यवान आहे. ही काल्पनिक कथा जवळजवळ पूर्णपणे फाळणीच्या काळातील असून लोकांची घेतलेली कहाणी आहे." 'अमर सिंह चमकिला' नंतर, ए.आर. रहमान, इर्शाद कामिल आणि इम्तियाज अली या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
भारताच्या फाळणीमुळे तुटलेली प्रेमकहाणी रूपेरी पडद्यावर, झळकणार हे कलाकार, Teaser
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल