TRENDING:

Atul Kulkarni: 7 भाषांमध्ये केले 70 हून अधिक सिनेमे, मल्टिटॅलेंटेड अतुल कुलकर्णीविषयी या गोष्टी माहितीय का?

Last Updated:
Atul Kulkarni: बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अतुल कुलकर्णी. त्यांचा 10 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. यंदा ते त्यांचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. याचनिमित्ताने त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
1/8
7 भाषांमध्ये 70 हून अधिक सिनेमे, मल्टिटॅलेंटेड अतुल कुलकर्णीविषयी खास गोष्टी
बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अतुल कुलकर्णी. त्यांचा 10 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. यंदा ते त्यांचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. याचनिमित्ताने त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
2/8
अतुल हे केवळ एक दमदार अभिनेता नाहीत तर पटकथालेखक, नाटककार आणि निर्माता म्हणूनही त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यामुळे ते एक बहुरंगी कलाकार आहेत.
advertisement
3/8
अतुल कुलकर्णींचा जन्म 10 सप्टेंबर 1965 रोजी कर्नाटकात झाला. लहानपण सोलापूरमध्ये गेलं. हरिभाई देवकर हायस्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला, पण तो अभ्यासक्रम मध्येच सोडला.
advertisement
4/8
इंग्रजी विषयात बी.ए. पूर्ण करत असतानाच त्यांचा अभिनयाकडे ओढा वाढला. राज्य नाट्यस्पर्धांमध्ये त्यांनी आपली कला दाखवली आणि अनेक पुरस्कार पटकावले. पुढे ते दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयात दाखल झाले आणि अभिनय-नाट्यकलेचं व्यावसायिक शिक्षण घेतलं.
advertisement
5/8
अतुल यांनी 1990 च्या दशकाच्या अखेरीस चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांचा पहिला ठसा उमटवणारा चित्रपट होता हे राम (२०००). त्यानंतर चांदनी बार, खाकी, पेज 3, रंग दे बसंती यांसारख्या चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
advertisement
6/8
मराठीत देवराई, चकवा, नटरंग आणि हॅपी जर्नी या चित्रपटांनी त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. विशेष म्हणजे त्यांनी हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा 7 भाषांमधील तब्बल 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
advertisement
7/8
अभिनयासोबतच अतुल यांनी लेखनाचीही धुरा सांभाळली. आमिर खान निर्मित लााल सिंह चड्ढा या चित्रपटाची पटकथा अतुल कुलकर्णी यांनी लिहिली होती. याशिवाय ते निर्माता म्हणूनही सक्रिय आहेत.
advertisement
8/8
अतुल कुलकर्णी यांनी 22 व्या वर्षी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णीशी लग्न केलं. या दांपत्याने आपल्याला मूल नको असा निर्णय घेतला असून, आपला वेळ आणि ऊर्जा समाजकारण, रंगभूमी आणि सर्जनशील कामांमध्ये घालवली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Atul Kulkarni: 7 भाषांमध्ये केले 70 हून अधिक सिनेमे, मल्टिटॅलेंटेड अतुल कुलकर्णीविषयी या गोष्टी माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल