मिळालेल्या माहितीनुसार भूम पंचायत समितीचे पालक तांत्रिक अधिकारी रवी राख व त्यांचा सहाय्यक कृष्णा बांगर काम आटोपून बोलेरो गाडीतून घराकडे निघाले होते. या दरम्यान काही अंतर दूर गेल्यानंतर इट आंदरूट रस्त्यावर बाईकवरून आलेल्या काही अज्ञातांनी त्यांची गाडी रोखली होती. गाडी रोखल्यानंतर अज्ञातांनी काहीतरी विचारण्याच्या बहाण्याने दरवाजा उघडायला लावताच दोघांना बाहेर ओढून काढच मारहाण केली.
advertisement
अज्ञातांनी कोयते, लाठ्या काठ्यांनी या दोघांना बेदम मारहाण केली.या मारहाणीनंतर रवी राख व कृष्णा बांगर हे दोन्ही शासकीय कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले होते. यातील एका शासकीय कर्मचाऱ्याला बीड येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते.
रोजगार हमीच्या बिलावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच हल्ला करणारे बीड राजकीय नेत्यांच्या संबंधित कार्यकर्ते असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या प्रकरणी वाशी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी शासकीय कर्मचारी दाखल झाले आहेत.आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सूरू आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तरूणाला बेदम मारहाण
धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यात एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे.पवनचक्कीच्या कामाविरोधात तक्रार करून उपोषण केल्याच्या रागातून पवनचक्की कंपनीच्या गुंडांनी या तरुण शेतकऱ्याला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत संबंधित शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बजरंग कोळेकर (रा. घाटनांदुर, ता. भूम) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, पवनचक्कीच्या कामाविरोधात तक्रारी केल्याचा राग मनात धरून काही गुंडांनी त्याला हॉकी स्टिकने तब्बल 22 मिनिटे मारहाण केली. यापूर्वी देखील कामाबद्दल तक्रार केल्याने त्याला 'बघून घेतो' अशी धमकी देण्यात आली होती, असेही त्याने सांगितले.