TRENDING:

Tomato Benefits : हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकतात टोमॅटो! पण नेमके कोणते, लाल की हिरवे?

Last Updated:
Green vs Red Tomato: हिवाळ्यात लाल टोमॅटोसह हिरवे, कच्चे टोमॅटो मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या लाल आणि हिरव्या टोमॅटोचा वापर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये करता येतो. मात्र, या दोन्हींपैकी नेमके कोणते टोमॅटो जास्त फायदेशीर आहेत. याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
advertisement
1/9
हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकतात टोमॅटो! पण नेमके कोणते, लाल की हिरवे?
अनेकांना याबद्दल संभ्रम असतो की लाल टोमॅटो हसत फायदेशीर आहेत की हिरवे? यावर पोषणतज्ञ नताली बटलर यांनी सांगितले की, दोन्ही आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहेत.
advertisement
2/9
प्रथम त्यांनी सांगितले कच्चे टोमॅटो कधीही खाऊ नयेत. कारण यामुळे विषबाधा होऊ शकते.
advertisement
3/9
लाल आणि हिरव्या दोन्ही टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. तसेच दात, हिरड्या आणि हाडांचे आरोग्य राखते.
advertisement
4/9
हिरव्या टोमॅटोमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचनास मदत होते. हिरवे टोमॅटो टाईप 2 मधुमेहामध्ये खूप फायदेशीर ठरतात.
advertisement
5/9
लाल आणि हिरव्या टोमॅटोमध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. बीटा कॅरोटीन शरीरात व्हिटॅमिन ए तयार करण्यास मदत करते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
6/9
कच्च्या टोमॅटोमध्ये पिकलेल्या टोमॅटोपेक्षा जास्त पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन के असते. त्यामुळे उच्च रक्तदाबासाठी हिरवे टोमॅटो जास्त फायदेशीर आहे. मात्र, हिरव्या टोमॅटोपेक्षा लाल टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते.
advertisement
7/9
जर आपण ते शिजवून खाल्ले तर टोमॅटोमधील व्हिटॅमिन सीच्या तुलनेत लाइकोपीनचे प्रमाण वाढते. हिरव्या टोमॅटोपेक्षा लाल टोमॅटोमध्ये फायबरचे प्रमाण काहीसे जास्त असते.
advertisement
8/9
मात्र, हिरव्या किंवा कच्च्या टोमॅटोमध्ये लाल टोमॅटोपेक्षा जास्त ऊर्जा, प्रथिने आणि कॅल्शियम असते. याशिवाय व्हिटॅमिन के, कोलेजन, आयर्न, व्हिटॅमिन सी, थायमिन देखील हिरव्या टोमॅटोमध्ये आढळतात.
advertisement
9/9
लाल टोमॅटोमध्ये आहारातील फायबर, व्हिटॅमिन ए, फोलेट, मॅग्नेशियम, झिंक मोठ्या प्रमाणात आढळतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tomato Benefits : हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकतात टोमॅटो! पण नेमके कोणते, लाल की हिरवे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल