TRENDING:

UPSC Success Story: वय वर्षे 25! शेतकऱ्याचा लेक ‘क्लास वन’ अधिकारी! प्रज्वल पोळने UPSC परीक्षेत कसं मिळवलं यश?

Last Updated:
UPSC Success Story: ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील प्रज्वल पोळ यांनी कोणत्याही खासगी क्लासेसचा आधार न घेता UPSC परीक्षेत हे यश मिळविले.
advertisement
1/7
वय 25! शेतकऱ्याचा लेक क्लास 1 अधिकारी! प्रज्वल पोळने सांगितलं UPSC यशाचं गुपित
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा-2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये देशभरातील 958 विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. तर महाराष्ट्रातील 60 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रज्वल राजेंद्र पोळ यांनी देखील घवघवीत यश संपादित केले आहे.
advertisement
2/7
प्रज्वल पोळ हे गंगापूर तालुक्यातील शंकरपूरच्या एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले असून ऑल इंडिया रँक 434 आली आहे. प्रज्वल यांची भारतीय महसूल सेवा (आयकर अधिकारी) पदावर निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
advertisement
3/7
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील प्रज्वल यांनी कोणत्याही खासगी क्लासेसचा आधार न घेता हे यश मिळविले. स्वतःची जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पोळ परिवाराकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत प्रज्वल यांना पुष्पहार घालून पेढे वाटण्यात आले.
advertisement
4/7
प्रज्वल यांचे वडील राजेंद्र पोळ हे शेतकरी असून तेलासूर बाजारपेठेतील कृषीसेवा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यापारी म्हणून ओळखले जातात. कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी असतानाही प्रज्वल यांची नागरी सेवेत काम करण्याची जिद्द होती. त्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले.
advertisement
5/7
अभ्यासाचे नियोजन दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा दोन स्तरांवर केले. सर्वप्रथम यूपीएससीचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) समजून घेतले आणि त्यानुसार तयारी सुरू केली.
advertisement
6/7
आठवड्याला आणि महिन्याला टार्गेट ठरवून अभ्यास केला. नियमित रिव्हिजन आणि उत्तरलेखन सरावावर विशेष भर दिला. काही विषयांसाठी मार्गदर्शन आणि संकल्पना स्पष्ट करण्यासाठी क्लासेस घेतले होते. मात्र त्याचबरोबर स्वअभ्यास, पुस्तके आणि PYQs यांवर अधिक भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
7/7
मुलाखतीसाठी प्रामुख्याने मॉक इंटरव्ह्यू दिले. चालू घडामोडींचा अभ्यास केला आणि स्वतःची मते संतुलित व तर्कशुद्ध पद्धतीने मांडण्याचा सराव केला. या सगळ्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले. या यशात आईवडील, शिक्षक, सर्व कुटुंबीय आणि मित्र परिवाराचे मोठे योगदान असल्याचेही प्रज्वल यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
UPSC Success Story: वय वर्षे 25! शेतकऱ्याचा लेक ‘क्लास वन’ अधिकारी! प्रज्वल पोळने UPSC परीक्षेत कसं मिळवलं यश?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल