IND vs NZ Final : कुलदीप IN वरूण OUT... टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियामध्ये 2 बदल? प्रिमियम बॅटरचं काय होणार?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs New Zealand Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल खेळवली जाणार आहे. अशातच टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी, 8 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 चा हाय-व्होल्टेज फायनल सामना रंगणार आहे. टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असणार आहे.
advertisement
2/7
आजवर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताला एकदाही न्यूझीलंडला पराभूत करता आलेलं नाही. वर्ल्ड कपमधील तिन्ही सामन्यांत कीवी संघाने बाजी मारलीये, त्यामुळे हा इतिहास बदलण्यासाठी सर्वस्व पणाला लावावं लागेल.
advertisement
3/7
जर आपण उभय संघांमधील एकूण 30 टी-ट्वेंटी सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला, तर भारताचे पारडं थोडं जड दिसतंय. भारताने 16 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 11 सामन्यांत विजय मिळवला आहे. 3 सामने टाय झाले असून, त्यापैकी दोन सामने भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकले आहेत.
advertisement
4/7
अशातच आता फायनलच्या सामन्यात टीम इंडियामध्ये दोन बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्टार स्पिनर वरूण चक्रवर्तीला डावलून कुलदीप यादवचं कमबॅक होण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
वरूण चक्रवर्तीला गेल्या तीन मॅचमध्ये चांगलाच चोप मिळाला आहे. तसेच त्याला अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यामुळे अहमदाबादमध्ये त्याला संधी मिळेल की नाही? यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
advertisement
6/7
तसेच टीम इंडियाचा स्टार बॅटर अभिषेक शर्मावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. रिंकु सिंगला अखेरच्या मॅचमध्ये संधी मिळेल की काय? असा सवाल उपस्थित होतोय. पण याची शक्यता कमी आहे.
advertisement
7/7
दरम्यान, अभिषेक शर्मा सध्या फॉर्ममध्ये नसला तरी तो कोणत्याही क्षणी मोठी खेळी करू शकतो. अभिषेक शर्मामुळे विरोधी संघात धाकधूक असते. त्यामुळे सूर्या टॉप थ्रीमध्ये कोणतेही बदल करणार नसल्याचं बोलला होता.दरम्यान, अभिषेक शर्मा सध्या फॉर्ममध्ये नसला तरी तो कोणत्याही क्षणी मोठी खेळी करू शकतो. अभिषेक शर्मामुळे विरोधी संघात धाकधूक असते. त्यामुळे सूर्या टॉप थ्रीमध्ये कोणतेही बदल करणार नसल्याचं बोलला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ Final : कुलदीप IN वरूण OUT... टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियामध्ये 2 बदल? प्रिमियम बॅटरचं काय होणार?