ठाण्यातील वागळे इस्टेट, इंदिरानगर भागात सावित्री सरोज (55) आणि त्यांची मुलगी सरोजा (38) या एकाच इमारतीत राहतात. त्यांच्यात सकाळी साडेनऊच्या सुमारास पाणी भरण्यावरून वाद झाला. पालिकेचे पाणी आले तेव्हा सरोजा हिने खालच्या रुममधून ती राहात असलेल्या वरच्या माळ्यावर पाणी भरण्यासाठी रबरी पाइप लावला.
advertisement
लेक सरोजा यांनी पाणी भरण्यासाठी लावलेल्या पाइपमधून खाली राहात असलेल्या आई सावित्री यांच्या घरात पाणी सांडले. त्यातच मुलाची मुले झोपलेली असताना बादल्यांचा आवाज केला. यावरून आईने जाब विचारल्याने दोघींमध्ये वाद झाला. यावर चिडलेल्या जावयाने सासूला जबर मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी मुलगी सरोजा हिने आईला धरून ठेवले, तर जावई संजय सरोज (42) याने बांबू आणि हाताने सासूला मारहाण केली.
दरम्यान, मुलगी आणि जावई आईला मारत असताना मेव्हणा शिव अडवायला गेला. तेव्हा जावयाने त्यालाही बांबूने मारहाण केली. सावित्री यांनी याप्रकरणी मुलगी आणि जावई या दोघांविरुद्ध श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
