Arjun Tendulkar : डोक्यावर अक्षता पडल्या अन् लग्नाच्या 24 तासातच अर्जुन तेंडूलकरने घेतला मोठा निर्णय, सचिनची मान उंचावली!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Arjun Tendulkar return to cricket after Wedding : भारताचा युवा खेळाडू आणि सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन याने लग्नाच्या 24 तासात मोठा निर्णय घेतलाय.
advertisement
1/7

भारतीय क्रिकेटमधील उगवता स्टार आणि सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने गुरुवारी, 5 मार्च रोजी आपली मैत्रीण सानिया चंडोक हिच्यासोबत विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याची सुरुवात केली. मुंबईत त्याने लग्नगाठ बांधली.
advertisement
2/7
अर्जुनच्या या ग्रँड सोहळ्याला क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. मात्र, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अर्जुनने थेट क्रिकेटच्या मैदानावर एन्ट्री करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
advertisement
3/7
लग्नानंतर लगेच शुक्रवारी तो डीवाय पाटील टी-20 कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये खेळताना दिसला. डीवाय पाटील टी-20 कपच्या सेमीफायनलमध्ये अर्जुन तेंडुलकर डीवाय पाटील ब्लू या टीमकडून खेळत होता. या मॅचमध्ये त्याच्या टीमसमोर मुंबई कस्टम्सचे आव्हान होते.
advertisement
4/7
दुर्दैवाने, अर्जुनची टीम ही सेमीफायनल 5 विकेटने हरली. अर्जुनसाठी वैयक्तिकरीत्या देखील ही मॅच फारशी चांगली ठरली नाही. बॅटिंग करताना त्याने 14 बॉलमध्ये केवळ 9 रन केले, तर बॉलिंग करताना एकाच ओव्हरमध्ये 20 रन खर्च केले.
advertisement
5/7
विशेष म्हणजे, लग्नाच्या आदल्या दिवशी सुद्धा अर्जुन क्रिकेट खेळण्यात व्यग्र होता. लग्नाच्या धावपळीतही त्याने खेळाला प्राधान्य दिले आणि कॅनरा बँकेविरुद्धच्या लीग मॅचमध्ये सहभाग नोंदवला होता.
advertisement
6/7
अर्जुन आणि सानिया चंडोक यांचा ऑगस्ट 2025 मध्ये साखरपुडा झाला होता. त्यांच्या लग्नाआधीचे संगीत आणि मेहंदीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
7/7
दरम्यान, अर्जुनच्या क्रिकेट करिअरबद्दल बोलायचे झाले तर, डोमेस्टिक लेव्हलवर तो गोवा टीमचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये दीर्घकाळ मुंबई इंडियन्सचा भाग राहिलेल्या अर्जुनला आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने 30 लाख रुपयांना खरेदी केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : डोक्यावर अक्षता पडल्या अन् लग्नाच्या 24 तासातच अर्जुन तेंडूलकरने घेतला मोठा निर्णय, सचिनची मान उंचावली!