TRENDING:

Skin Care Tips : उन्हाळ्याची तयारी आतापासूनच.. 'या' घरगुती उपायाने टॅनिंग आणि सनबर्नचं टेन्शन होईल दूर

Last Updated:
Home Remedies to Remove Tanning : उन्हाळा सुरू झाला आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हाचा चटका जाणवतोय. यंदाचा उन्हाळा हा जास्त उष्ण असेल असा अंदाज देखील वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत आपण सर्व प्रकारे आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेणं आवश्यक ठरतं. उन्हाळ्याच्या कडक उन्हात टॅनिंग, सनबर्न आणि त्वचेची जळजळ यासारख्या समस्या सामान्य होतात. परंतु तुम्ही योग्य ती काळजी घेऊन हा त्रास दूर ठेवू शकता. यासाठी भोपळ्याची साल अतिशय फायदेशीर ठरते.
advertisement
1/9
उन्हाळ्याची तयारी आतापासूनच, 'या' उपायाने टॅनिंग आणि सनबर्नचं टेन्शन होईल दूर
भोपळ्याच्या सालीत 90 टक्क्यांहून अधिक पाणी, व्हिटॅमिन सी आणि झिंक असते. हे सर्व घटक त्वचेला थंड आणि मॉइश्चरायझ करण्यास मदत करतात. उन्हातून घरी परतल्यानंतर भोपळ्याची साल चेहऱ्यावर किंवा हातावर हलक्या हाताने घासल्याने आराम मिळू शकतो. तज्ञांच्या मते, याचा नियमित वापर केल्यास टॅनिंग कमी होऊ शकते. परंतु कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट आवश्य करा.
advertisement
2/9
उन्हाळ्याच्या कडक उन्हात तुम्ही घराबाहेर पडत असाल तर तुम्हाला त्वचेवर टॅनिंग, सनबर्न आणि जळजळ यासारख्या समस्या जाणवू शकतात. बाजारात यासाठी अनेक महागडे प्रोडक्ट्स उपलब्ध आहे. परंतु त्याऐवजी तुम्ही भोपळ्याच्या सालीचा घरगुती उपाय करू शकता. अनेकदा कचरा म्हणून फेकून दिले जाणारी ही साल त्वचेसाठी नैसर्गिक उपचाराप्रामणे काम करते. सौंदर्य तज्ञ आणि आयुर्वेद तज्ञांच्या मते भोपळ्याची साल सनबर्न कमी करण्यास मदत करते.
advertisement
3/9
भोपळ्याच्या सालीत 90 टक्क्यांहून अधिक पाणी असतं आणि ते त्वचेला नैसर्गिकरित्या थंड आणि मॉइश्चरायझ ठेवण्यास मदत करतं. त्यात त्वचेसाठी फायदेशीर मानले जाणारे व्हिटॅमिन सी आणि झिंक सारखे पोषक घटक असतात. उन्हातून घरी परतल्यानंतर ताज्या भोपळ्याची साल चेहऱ्यावर किंवा हातावर हलक्या हाताने घासल्याने त्वचेला त्वरित थंडावा आणि हायड्रेशन मिळू शकते. यामुळे उन्हात जळलेल्या त्वचेला आराम मिळतो आणि जळजळ किंवा लालसरपणा कमी होण्यास मदत होते.
advertisement
4/9
त्वचा तज्ञांच्या मते, भोपळ्याच्या सालीचा सौम्य नैसर्गिक ब्लीचिंग प्रभाव असतो आणि तो त्वचेतील अतिरिक्त मेलेनिन संतुलित करण्यास मदत करू शकतो. त्याचा नियमित वापर केल्यास उन्हामुळे होणारे टॅनिंग हळूहळू कमी होऊ शकते. हा जादूचा उपाय नसला तरी तो एक सुरक्षित, सोपा आणि परवडणारा घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे.
advertisement
5/9
आयुर्वेदानुसार, भोपळा थंड आणि पित्त नाशक मानला जातो. आयुर्वेदिक विद्वानांच्या मते, तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णता त्वचेचा "भ्रजक पित्त" वाढवते. त्यामुळे काळेपणा, जळजळ आणि कोरडेपणा येऊ शकतो. भोपळ्याच्या सालीचे नैसर्गिक थंड गुणधर्म या वाढलेल्या पित्तला शांत करण्यास मदत करतात. शिवाय या सालीचा वापर केल्याने त्वचा मऊ होते आणि त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होते.
advertisement
6/9
भोपळ्याची साल वापरण्याचा हा घरगुती उपाय त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानला जातो. टॅनिंग आणि सनबर्न कमी करण्यासोबतच तो त्वचेला ताजेतवाने करण्यास ठेवतो. काही लोकांना त्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे सौम्य मुरुमे देखील कमी करण्यास मदत होते. या चा नियमित आणि योग्य वापर केल्यास त्वचा ताजी, स्वच्छ आणि टवटवीत दिसते.
advertisement
7/9
भोपळ्याची साल वापरणं खूप सोपं आहे. यासाठी ताज्या भोपळ्याची जाड साल सोलून काढा. उन्हातून किंवा बाहेर आल्यानंतर 5 ते 7 मिनिटे ती साल तुमच्या चेहऱ्यावर आणि हातांवर हलक्या हाताने घासून घ्या. या सालीचा रस तुमच्या त्वचेवर सुमारे 10 मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा आणि हात थंड पाण्याने धुवा. हा सोपा घरगुती उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरता येतो.
advertisement
8/9
भोपळ्याची साल वापरण्यापूर्वी काही खबरदारी घेणे महत्वाचे आहे. जर भोपळा कडू असेल तर त्याची साल त्वचेवर लावू नका, कारण यामुळे अ‍ॅलर्जी किंवा जळजळ होऊ शकते. साल चेहऱ्यावर किंवा हातावर घासताना जास्त दाब देऊ नका, कारण यामुळे लालसरपणा किंवा सौम्य सूज येऊ शकते. कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट आवश्यक करा. यासाठी तुमच्या मनगटावर थोड्या प्रमाणात सालीचा रस लावा आणि त्यावर तुम्हाला काही त्रास होतोय का ते पाहा, होत नसेल तरच हा उपाय करा.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Skin Care Tips : उन्हाळ्याची तयारी आतापासूनच.. 'या' घरगुती उपायाने टॅनिंग आणि सनबर्नचं टेन्शन होईल दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल